स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियन पुणे जिल्हा संघटनात्मक बैठक

34

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.30जून):-स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियन पुणे जिल्ह्याच्या वतीने जनता वसाहत समाज मंदिर पर्वती पुणे येथे संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्ष स्थानी प्रकाश चव्हाण-अध्यक्ष स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियन हे होते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सागर रामभाऊ तायडे सल्लागार स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियन आणि राज्य कमिटीचे रमेश सोलंकी.सुरेश तावरे.राहूल रेळे. चित्राताई पवार,दत्तात्रय मोरे,उपस्थित होते.पुणे शहरातील पर्वती भागामध्ये पुणे शहर नाभिक युवा शहर मंच यांच्या माध्यमातून स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियन यांची संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत युनियन बांधणी करून असंघटित सलून ब्युटी पार्लर कामगारांना संघटित करून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सवलती मिळविण्यासाठी संघर्ष करण्यास सज्ज झाले पाहिजे असे प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १००००/अनुदान जाहिर केले होते ते अजून मिळाले नाही त्या बद्धल युनियन ने जाहीर निषेध व्यक्त केला.आणि यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्याधिकारी यांच्याशी सनदशीर मार्गाने पत्रव्यवहार करून अनुदान मिविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.तसेच येणाऱ्या काळात सलून व्यवसाय धोक्यात आला आहे त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनात्मक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येईल असे प्रकाश चव्हाण यांनी सांगितले..

नाभिक समाजाचा ऐतिहासिक देशातील पहिला संप महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नेतृत्वाखाली घडवून आणला याचा इतिहास आजचा नाभिक समाज विसरला आहे.त्यांनी आज कुशल कारागीर कामगार म्हणून संघटीत झाले पाहिजे.आणि कुशल कारागीर कामगारांना न्याय हक्क मिळण्यासाठी संघटीतपणे संघर्ष करण्याची गरज आहे.असे सागर तायडे सल्लागार स्वतंत्र सलून ब्युटीपार्लर कामगार युनियन,अध्यक्ष स्वतंत्र मजदुर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले.
पुढे सागर तायडे असे म्हणाले की स्वतंत्र सलून ब्युटीपार्लर कामगार युनियनच्या कारागीर कामगारांच्या मागे स्वतंत्र मजदूर युनियन राज्यातच नव्हे तर देशपातळीवर उभी राहणार आहे.कारण आदरणीय जे.एस.पाटील यांच्या त्यागी कुशल नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन देशात बावीस राज्यात व सतरा क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहे.

त्यात सलून ब्युटीपार्लर कामगार जोडल्या गेल्यामुळे त्यांची सुद्धा संघटीत शक्ती वाढली जाणार आहे.त्यामुळे राज्य व केंद्र सरकार कडून कल्याणकरी योजनाची अंमलबजावणी करण्यास मोठी मदत होईल असे सागर तायडे यांनी सांगितले.सुरेश तावरे उपाध्यक्ष यांनी असे म्हटले की सलून सलून ब्युटी पार्लर कामगारांनी आता एकत्र येण्याची गरज आहे जर एकत्र आलो नाही तर पुढच्या सातपिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत असे सांगितले.सदर बैठकीत स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियन राज्य कमिटीचे रमेश सोलंकी कार्याध्यक्ष, राहूल रेळे राज्य सचिव,चित्राताई पवार महिला प्रमुख यांची मार्गदर्शक भाषणे झाली.सदर जिल्हा बैठकीत श्री दत्तात्रय मोरे यांना जिल्हा अध्यक्ष पदी,सुरज तावरे यांची जिल्हा सचिव पदी तसेच श्री मंगेश काळे यांची पुणे शहर अध्यक्ष पदी आणि सौ.प्रियांका काणेकर यांची महिला अध्यक्ष पदी राज्य कमिटीच्या वतीने सर्वांनुमते निवड करण्यात आली.

सर्वच समाज आरक्षण मागत आहेत त्यात आपण कुठे आहोत याची नाभिक समाजाला जाणीव आहे काय?. आरक्षणाची अभ्यासपूर्ण माहिती असण्यासाठी एड पुरुषोत्तम खेडेकर लिखित मराठा आरक्षण इतिहास,अडचणी व शाश्वत पर्याय,आणि मराठा ओबीसीकरण हाच पर्याय हे वैचारिक प्रबोधन करणारे छोटी पुस्तके प्रमुख पदाधिकाऱ्यांना सागर रामभाऊ तायडे यांच्या हस्ते भेट म्हणून देण्यात आले.
स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार युनियन पुणे जिल्हा संघटनात्मक बैठक यशस्वी करण्यासाठी दत्ता भालेराव यांनी विशेष मेहनत घेतली म्हणून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी सुरज तावरे मुख्य आयोजक यांनी सर्वांचे आभार मानले.या संघटनात्मक बैठकीला पुणे शहरातील विविध भागातील स्वतंत्र सलून ब्युटी पार्लर कामगार लॉक डाऊनच्या निर्बंधांमुळे प्रतिनिधीक स्वरुपात उपस्थित होते.