महावीर दाल आणि आँईल मिल व रोटरी सिनियर्स दोंडाईचा आयोजित डेंटल कँम्पला भव्य प्रतिसाद

24

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.30जून):- महावीर दाल आणि आँईल मिल यांच्या सहकार्याने रोटरी सिनियर्स दोंडाईचा ,जवाहर मेडीकल फाऊंडेशन संचलीत ऐ.सी.पी.एम. डेन्टल काँलेज व डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेनेस्ट्री धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दंतचिकित्सा शिबिर रोटरी भवन येथे संपन्न झाले शिबिरात ७६० रुग्णांची तपासणी होऊन उपचार करण्यात आले तसेच दिर्घकाळ चालणारे रुग्णांना उपचार जवाहर मेडीकल फाऊंडेशन येथे माफक दरात करण्यात येतील .रुग्णांची तपासणी ऐ.सी.पी.एम. काँलेजचे प्राचार्य डॉ अरुण दोडामनी यांचे सहकारी दंतरोग चिकीत्सा तज्ञ डॉ वर्धमान जैन , डॉ अनोखी अग्रवाल , डॉ अस्मिता हमांद , डॉ स्नेहल थामके , डॉ श्रुती पुंडकर , डॉ तृप्ती टकले , डॉ कल्याणी बेदमुथा मुणोत इ तज्ञांनी तपासणी केली .

शिबिरात आ.जयकुमारभाऊ रावल यांनी भेट देऊन रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून कोविडच्या ससंर्गांनतंर उद्भवणारे म्युकोर मायकोसिस सारखे दुर्धर आजांराचे व इतर दंतरोगाचे निदान करुन गरजुंना ख-या अर्थाने सेवाकार्य केल्याचे सांगितले .शिबिरास बांधकाम सभापती निखिल जाधव , आरोग्य सभापती कृष्णा नगराळे माजी आरोग्य सभापती जितेंद्र गिरासे ,रोटरी क्लबचे हिमांशु शाह ,अनिस शाह ,राकेश जयस्वाल ,जैन सोशल ग्रुपचे दिनेश कर्नावट इ मान्यवरांनी भेट दिली .

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया ,सचिव राजेश माखिजा ,प्रो चेअरमन प्रविण महाजन , रविंद्र पाटील , महावीर दाल आणि आँईल मिलचे संचालक तथा जेष्ठ रोटरी सदस्य सुरेश जैन ,अभय जैन, हुसेन विरदेलवाला , नामदेव थोरात , केदारनाथ कवडीवाले ,डॉ मुकुंद सोहनी ,राजेश मुणोत , डॉ दिपक श्राँफ ,अमन जयस्वाल ,सौरभ अग्रवाल , डॉ राजेंद्र पाटील , राजेद्र परदेसी , महेंद्र चोपडा , किशोर मालपुरकर ,संजय छाजेड , डॉ सोहनलाल पारख , डॉ राजेंद्र गुजराथी , डॉ हितेंद्र देशमुख , डॉ अनिकेत मंडाले ,सौरभ मुणोत ,रमेश पारख ,प्रदीप पारख ,राजेश भंडारी , डॉ अमोल भामरे , डॉ सचिन पारख , डॉ पुरुषोत्तम भावसार ,चेतन जैन इ सदस्यांनी तसेच रोटरी आय हॉस्पिटल , रोटरी पतपेढी , रोटरी स्कुल , जवाहर मेडीकल फाऊंडेशनच्या कर्मचारी वृंदानी प्रयत्न केले .