संतांची वारकरी मूहमेंट

57

हिच व्हावी माझी आस l जन्मोजन्मी तुझा दास ll
पंढरिचा वारकरी l वारी चुकू न दे हरी ll
संत संगे सर्वकाळ l अखंड प्रेमाचा कल्लोळ ll
चंद्रभागे स्नान l तुका म्हने हेची दान ll

संत तुकोबाराय*
भारतीय सरंजामशाहीत वर्ग नव्हते तर सुरुवातीला वर्ण आणि नंतरच्या काळात जाती होत्या,ही कॉम्रेड शरद पाटलांची मांडणी.याद्वारे भारतीय सरंजामशाहीकडे पाहिल्यावर आपल्याला भारतीय इतिहासाचे विधायक ऐतिहासिक भौतिकवादी आकलन योग्य रित्या करता येते.भारतात जिथे जिथे सुबत्ता आली, तिथे तिथे ब्राम्हण या जातीच्या लोकांनी राजेपद नामधारी बनवून कारभार स्वताकडे ठेवला आणि आपले सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करुन दिर्घकालीन सत्ता उपभोगली होती.

मध्ययुगीन भारतीय इतिहासात ज्या ज्या राज्यव्यवस्था भरभराटीला आल्या, त्यात राजे महाराज्यांनी शेतकरी, कष्टकरी,भटके,आदिवासी जातींजमातींचे भले करण्याऐवजी मोठमोठी मंदिरे बांधली आणि ब्राम्हणी हित जोपासले.यात ब्राम्हणांच्या सांस्कृतिक राजकारणाला अनेक राजे बळी पडले होते.मंदिर संस्कृतीचे ब्राम्हणी स्तोम माजल्याने सर्वसामान्य वर्ग धर्मसंम्मत मार्गाने शोषन पिळवणूकीला बळी पडला होता. या ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाला मध्ययुगीन भारतात विरोध दर्शवला गेला तो संत चळवळीच्या माध्यमातून. संत चक्रधरस्वामी यांनी महानुभाव चळवळ उभी करुन ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारण संपवायला सुरुवात केल्याने त्यांना रामदेवराय यादवाच्या राज्यातील ब्राम्हणांच्याकडुन पैठण येथे खुप त्रास देण्यात आला होता.

महात्मा बसवेश्वर यांनी याच ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणाला च्यालेंज करुन बंड पुकारल्याने त्यांच्यासह सर्वच अनुयायांच्या हत्या झाल्या.सर्वात मोठी च्यालेंजेबल मुहमेंट उभी केली ती संत नामदेव यांनी. या मुहमेंटचे नाव वारकरी किंवा भागवत धर्म होते.यात संत नामदेव यांनी ब्राम्हणी विषमतावादी ग्रंथ नाकारून अभंग नावाने स्वतंत्र साहित्य निर्मिती केली होती.ब्राम्हणी तिर्थक्षेत्रे नाकारून पंढरपूर हे स्वतंत्र तिर्थक्षेत्र प्रसिद्धीस आनले होते.प्रत्येक गोष्टीला त्यांनी पर्याय दिला होता. सर्व ब्राम्हणी देव देवता नाकारून संत नामदेव यांनी स्वतंत्र मुर्तीसह विठ्ठल हा देव पर्याय म्हणून पुढे केला होता.जुने व्रतवैकल्ये नाकारून एकादशी सारखे नवे अब्राम्हणी व्रत पुढे आनले होते. यात मोठा प्रचारक वर्ग त्यांनी तयार केला ज्याला त्यांनी संत म्हटले. ब्राम्हणी धर्मात स्त्रीला हिन लेखले जायचे. लिखानाचे अभिव्यक्त होण्याचे आधिकार नव्हते. संत नामदेव यांनी स्त्रीला नेतृत्व दिले, विनेकरी बनवले, अभंग लिहायला शिकवले.या घटनेमुळे संत नामदेवांसह त्यांच्या घरच्या १४ जनांना खुप त्रास सहन करावा लागला.

पुढे सर्व प्रचारक असनारे संतही वेळोवेळी व्यवस्थेने त्रस्त केले गेले.महाराष्ट्रात सर्वात जास्त आणि दीर्घकाळ आपला प्रभाव उमटवनारे हेच वारकरी आंदोलन आहे. ज्याची सुरुवात संत नामदेव यांनी केली होती. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हा पर्याय त्यांनीच दिला होता. वर्षातुन दोन वेळा पंढरपूरच्या वाळवंटात हे आधिवेशन होत असे.यात गाव पातळीवर कोनते अभंग घेऊन जागृती करायची याचे ठराव पारित होत असत. पुढल्या काळात संत तुकोबारायांसारखे महान व्यक्तिमत्त्व सुद्धा ब्राम्हणी सांस्कृतिक राजकारणापुढे त्रस्त करुन सोडले गेले.संत तुकोबारायांना सुद्धा खुप त्रास देण्यात आला.संत हे समतावादी होते. त्यांची आध्यात्मिक असनारी समता सहभोजन करुन जाती अंतकही बनली होती. उंचनिच काही नेने भंगवंत म्हनत संत तुकोबाराय म्हणतात आमचा देव संत रोहीदासाच्या सोबत चामडे रंगवतो , सज्जन कसायासोबत मांस विकतो, चोखामेळ्यासोबत ढोरे ओढतो, दासी जनी सोबत शेन वेचतो, आमचा देव सवळ्यातला नाही. तो शुद्र नामदेवांच्या घरी जेवतो , कबिराचे शेले विनतो, मीराबाईसाठी विष पितो,
आमच्या देवाला उचनिच भेदभाव नसतो.

कर्म हाच धर्म आहे. वर्णधर्माने कुनी ग्रेट नसते. याबद्दल तुकोबाराय म्हणतात-

“वर्णधर्माभिमाने कोन झाले पावन l ऐसे द्या सांगुन मजपाशी ll “
सर्व संत वर्णजातीअंतक होते.त्याचे कितीतरी पुरावे देता येतील.संत मेळ्यात उच्चजातीय संत ज्ञानेश्वर महाराजांना संत चोखोबारायांच्या सोबत नामदेवरायांनी जेवायला लावले होते. मग संत ज्ञानेश्वर म्हणतातयातीकुळ माझे गेले हरपून l श्रीरंगावाचुन नेनो काही ll त्याकाळी हे धाडस करणे अत्यंत जिकरीचे काम होते.तो काळ जातीव्यवस्था वर्णव्यवस्थेच्या कडक अंमलबजावणी चा काळ होता.संत नामदेव संत चोखोबारायांसारख्यांना मंदिराबाहेर हाकलून दिले जात होते.तरिही संतांनी बंड केले.या संतांच्या सांस्कृतिक राजकारणाला लक्षात घेतले असते तर बऱ्याच पुरोगामी पक्ष संघटनांची सत्ता आली असती.आज घडीला जो जे वांछिल तो ते लाहो म्हनने समतावादी आहे, समाजवादी आहे .

किंवा दया करणे जे पुत्रांशी l तोची दासा आणि दासी ll
(दास दासिंवर मुलांसारखी दया करावी,वागणूक द्यावी) हे तर जानिव नेनीवेसह डिकास्ट होण्याचे लक्षण आहे.
वारकरी या अब्राम्हणी परंपरेतल्या आषाढी वारी सोहळ्याच्या शुभेच्छा !!

✒️ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज(परभणीकर)मो. 9970744142