मुस्लिम समाजचे 5% आरक्षणाची अमलबजावणी करावी, वंचितच्या विधानभवनावरील मोर्चा अनुकरण, अंबाजोगाई तालुका वंचितच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

25

🔹धार्मिक प्रतिकांचा वापर करून दंगली घडवणार्यां प्रवृतीसाठी कायदा करण्यात यावा-अॅड.बाळासाहेब आंबेडकर

✒️राहुल कासारे(अंबाजोगाई प्रतिनिधी)मो:-97634 63407

अंबाजोगाई(दि.6जुलै):-वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रध्येय ऍड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी मुस्लिम समाजाच्या 5%आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणी साठी काल मुंबई येथे विधान भवनावर, मुस्लिम बांधवांना घेऊन व त्यांच्या संघटना यांच्यासह भव्य महामोर्चा काढला व सरकारने मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा. ही समज दीली. याचेच अनुकरण म्हणून बिड जिल्हय़ातील ता. अंबाजोगाई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या आरक्षण अंमलबजावणी लवकरात लवकर करा यासाठी अनेक मुस्लिम बांधवांना घेऊन, उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्च्या काढण्यात आला व मा.उपजिल्हाधिकारी श्री शरदजी झाडके यांना निवेदन देणायत आले.

या मोर्च्यात वंचित ब आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुशांत धावरे,तालुका अध्यक्ष संजय तेलंग,तालुका उपाध्यक्ष जयपाल दहिवाडे,तालुका प्रवक्ता गोविंद मस्के,तालुका महासचिव उमेश शिंदे,वंचित ब आघाडी युवा नेते स्वप्नील ओव्हाळ,तालुका कोषाध्यक्ष राहुलजी कासारे,मुजीब शेख,अमोल पचपिंडे,अजय तट,सुनीलजी सरवदे,अमर दहिवाडे,वाव्हळे पाटील,प्रताप साळवे,संजय गवळी, पत्रकार नवनाथजी पौळ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.