राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त देगलूर तालुक्यात वृक्षारोपन

23

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.६जुुलै):- शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचे आधारस्तंभ, महाराष्ट्राचे लोकनेते शालेय शिक्षण, जलसंपदा, महिला व बालकल्याण राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने देगलूर तालुक्यातील मरतोळी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन करून रचनात्मक पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, देगलूरचे तालुका प्रमुख व शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांच्या हस्ते व दिपक रेड्डी मरतोळीकर यांच्या पुढाकारातून मरतोळी ग्राम पंचायत, विठ्ठल मंदिर पंचपुरा परिसरात अंबा, चिंच व इतर देशी रोपांचे वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी मरतोळीचे सरपंच भाऊसाहेब पाटील, हाणमंत महाराज कंठाळीकर, बलभीम पाटील, सुर्यकांत देशमुख, भरत पाटील, संतोष सुकनाळे, व्यंकट सुकनाळे, शिवप्पा सुलफुले, माधवराव सुकनाळे, शंकर रामशेट्टे, दादाराव बेळीकर, राम भूताळे, बालाजी शिंदे, बसवंत रामशेट्टे, बालाजी गिरी, रावसाहेब बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपकरेड्डी नादरगे,राजशेखर पाटील, राजेंद्र आंदलवाड, संदिप शिंपाळे, श्रीकांत हंगरगे, नवनाथ बेळीकर, माधव आवळे, श्याम पाटील, निखील आंदलवाड, शिवाजी आवळे या तरूणांनी विशेष मेहनत घेतली.