जिल्हाधिकारी कार्यालया समोर माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक यांचे १ वाजता पासुन आमरण उपोषण सुरू

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.8जुलै):- शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडे गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील मुख्यधापक यांची तक्रार देण्यात आली मात्र चार महिने लोटुनही कोणतीही चौकशी व कार्यवाही करण्यात आलेली नाही म्हणून माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल वासनिक यांनी थेट जिल्हाधिकारी यांना बेमुदत आमरण उपोषणाची नोटीस देण्यात आले. प्रमुख मागण्या..

(१)गणेश अलंकार विद्यालय निमगांव येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. (२) महात्मा गांधी विद्यालय आरमोरी येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. (३) बोगस अप्रोलची चौकशी करण्यात यावी. (४) जिजामाता हायस्कूल ईरुपटोला येथील चौकशी न करता आर्थिक गैरव्यवहार करुन प्रकरण दाबल्याबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा मागण्यासह त्यांनी आज दुपारी १ वाजता पासुन बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली.