शिवसेनेची कोंडी व सामाजिक समतोल-भाजपा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार

23

✒️ऍड अविनाश टी काले , अकलूज,ता माळशिरस,जि.सोलापूर(9960178213)

मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करीत 43 जनाचे समावेश करीत मंत्रि मंडळाचा विस्तार केला•
महाराष्ट्रा तून चार चेहरे घेतले गेले ज्यात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, भागवत कराड,, कपिल पाटील, व भारती पवार या चेहऱ्यांचा समावेश आहे•नारायण राणे यांचा आक्रमक चेहरा महाराष्ट्राला माहीत आहे, त्यांचा शिवसेने ला असलेला प्रखर विरोध मराठा आरक्षणावर त्यांचा असलेला अभ्यास, कोकण आणि मुंबई या पट्ट्यावर त्यांचे असलेले राजकीय वर्चस्व ! लक्षात घेऊन त्यांना ही संधी देण्यात आली आहे•भाजपाने नारायण राणे यांना राज्यसभेचे खासदार बनवून प्रथम संधी दिली, शिवसेना सोडल्यानंतर ते काँग्रेस पक्षामध्ये गेले , परंतु काँग्रेस पक्षाने म्हणावी तशी कदर या नेतृत्वाची केली नाही•

काँग्रेस पक्षाच्या वर्तनाचे वर्णन असे केले जाते की,
हा पक्ष “बर्फही थंड करून खातो” नारायण राणे सारखा आक्रमक चेहरा त्यांच्यासोबत आला असतानाही, त्यांचा म्हणावा तसा वापर या पक्षाला करता आला नाही•पक्षीय धोरणे पक्ष सोडून गेलेल्या नेतृत्वाकडून किंवा त्यांच्या सल्ल्याने घेतली जात असल्याने, काँग्रेसची होणारी पीछेहाट त्यांच्या लक्षात कधीच आली नाही•ज्या काँग्रेस मधून फुटून निघून राष्ट्रवादी स्थापन केली •त्याच नेतृत्वाला केंद्रीय मंत्री मंडळात ही महत्वाचे स्थान काँग्रेस पक्षाने दीले•परंतु थेट काँग्रेस मध्ये आलेल्या नारायण राणे सारख्या अनुभवी लढवय्या नेत्यास काँग्रेसने सामावून घेतले नाही•

परिणामी त्यांनी भाजपा स्वीकारली, आज यांचे राजकीय फळ त्यांना प्राप्त झाले•नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाने कोकण पट्ट्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था चे निवडणुकीत याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होईल•
मुंबईमध्ये शिवसेनेशी टक्कर घेण्याची क्षमता त्यांचे मुळे विकसित होईल•जशास तसे उत्तर देण्याची क्षमता राणे घराण्याकडे आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेला सोडचिट्टी देऊ पाहणारे जे कोणी असतील त्यांना एकत्रित करणे हे राणे यांच्यामुळे शक्य होईल•याच पट्ट्यातील कपिल पाटील हे नाव महत्त्वपूर्ण आहे,ठाणे जिल्ह्यातील हे नेतृत्व असून, आगरी कोळी समाजातील हे प्रसिद्ध नाव आहे•

नवी मुंबई येथील नव्याने उभे राहत असलेल्या विमानतळास दि• बा• पाटील यांचे नावाला शिवसेनेने विरोध केला• आगरी कोळी समाजाची अस्मिता ठरलेले, कै , दि• बा• पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे म्हणून लाखोच्या संख्येने आगरी कोळी समाज या कोरोना काळात ही रस्त्यावर उतरला होता•
शिव सेनेचे संस्थापक असलेले कै हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, यांच्या प्रस्तावित नावाला त्यांनी विरोध दर्शवण्याची हिंमत दाखवली• यानिमित्ताने आगरी कोळी समाजाचे अस्तित्व आणि अस्मिता उजागर झाली•आगरी-कोळी समाजाचे असलेले कपिल पाटील, यांना केंद्रीय सत्तेत स्थान दिल्याने ठाणे पालघर व रायगड या विभागात आगरी कोळी समाजाची असलेली जनशक्ती याचे ध्रुवीकरण करणे भाजपाला शक्य होईल•

मोगल सत्ते विरोधात प्रखर लढा देणारे “महाराणा प्रताप,” यांच्या संदर्भात एक कथा सांगितली जाते, जंगलातील आदिवासी समाजा समवेत ते जेवत असताना एक आदिवासी त्यांना म्हणाला भाकरी ही नेहमी कडेकडेने खाल्ली जाते•
कोणत्याही एकत्रित सैन्याचा पराभव करण्या साठी, त्या सैन्यावर थेट हल्ला करण्याऐवजी, त्याला चारी बाजूने कसे कोंडता येईल याची रणनीती आखली जाते! त्यास शिवकालीन इतिहासात” वेढा ” दिला असे इतिहासात आपण वाचले आहे• नारायण राणे व कपिल पाटील यांच्या रूपाने राजकीय वे ढा टाकला गेला आहे, तर दुसऱ्या बाजूने शिवसेनेच्या मंत्र्यांना ई डी चे चौकशी फेऱ्या त अडकवून त्यांना सळो की पळो करून सोडले आहे•

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी अलीकडे अशी खंत व्यक्त केली की” त्यांचे विरोधात असलेल्या लढाईत शिवसेनेने त्यांना म्हणावी तशी साथ दिली नाही”, आपण एकाकी लढलो असे त्यांनी म्हटले आहे ही बाब लक्षात घेतली तर, सत्ता हातात असताना ही ठाकरे साहेब शिवसेना नेत्यांचे ही रक्षण करू शकत नाहीत• हा संदेश शिवसेनेत पोहोचल्याने शिवसैनिकांत असलेला लढाईचा आत्मविश्वास कमी झाला आहे• लढण्याची मानसिकता हरवलेले सैन्य, लढाई जिंकून देऊ शकत नाही,हेही आपण लक्षात घेतले पाहिजे•मराठवाडा विभागातील डॉ भागवत कराड , हे भाजपचे 40 वर्षा पासून चे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, वैदकिय संस्था शी ते निगडित असल्याने अनेक उपक्रम त्यांनी राबवले आहेत• वंजारी समाजातील या नेतृत्व समावेशाने ,औरंगाबाद लोकसभेला नवे बळ प्राप्त होईल, तसेच सामान्य कार्यकर्त्याला ही या पक्षात न्याय मिळतो, ही भावना वाढीस लागेल•

मुंडे घराण्या भवती सत्ता केंद्रित ठेवण्याचे दुष्परिणाम हे होते की नव्या घराणेशाहीला भाजपा स्थापित करतो•असा संदेश राजकारणात गेला असता• भाजपामध्ये दीर्घकालीन राजकारणात घराणेशाही चालत नाही हा संदेश या निमित्ताने दिला गेला आहे•दिंडोरी, या उत्तर महाराष्ट्रातील “भारती” पवार यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी देऊन, आदिवासी चेहऱ्याला पुढे आणल्याने ,आदिवासी पट्ट्यात या नेतृत्वाचा फायदा भाजपाला होईल• एका अर्थाने या सर्व बाबीचा विचार केला तर मराठा, आगरी कोळी, ओबीसी, व आदिवासी अशा व्यापक समाजघटकांना भाजपने सामावून घेतले आहे• राज्य पातळीवर गोपीचंद पडळकर यांना विधान परिषद दिली गेल्याने धनगर समाज त्यांचे भोवती केंद्रित होत आहे•गोपीचंद पडळकर हे कांहीं राजकीय घराणे शाहितून आलेले नेतृत्व नाही.

अश्या सामाजिक समिकरणा सह नवीन सामाजिक समीकरणे भाजपाकडून यापुढे केले जाऊन अधिकाधिक सामाजिक बळ प्राप्त केले जाईल! यात मला तरी शंका नाही•
राजकीय घराणेशाहीची कुठलीच परंपरा नसलेले, सामाजिक राजकीय व आर्थिक दृष्ट्या उपेक्षित असलेल्या एस सी प्रवर्गातील नव नेतृत्वाला ही संधी भाजप कडून दिली जाईल! व भविष्य काळात फक्त राजकीय घराणे शाही जोपासत गडगंज संपत्ती जमवणाऱ्या भ्रष्टाचारी पक्षांना ते कितीही एकत्रित आले तरी, किंवा त्यांच्याकडून समाजाचा बुद्धीभेद करण्याचा कितीही प्रयत्न केला गेला तरी, या पक्षांचा राजकीय दृष्ट्या पराभव करून 2024 साली भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता निर्माण करेल•व केंद्रीय सत्तेला ही आवश्यक असलेले बळ महाराष्ट्र पुरवेल यात मला तरी शंका नाही•
तुर्त इतकेच,,,,,,,,,,,,,!