युवासेने मार्फत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत निःशुल्क औषधी वाटप

21

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि. जुलै):- युवासेना प्रमुख तथा कॅबिनेट मंत्री सन्मानीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व कोरोनाचा संभाव्य धोका लक्षत घेता शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे व युवासेनेचे जिल्हाप्रमुख Adv पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेवपुरा मोठ्या पुला जवळ रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले होते या शिबिरात १५० नागरिकांनी आपल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले होते, त्याचे रिपोर्ट दिनांक ०८/०७/२०२१ गुरुवार रोजी नागरिकांना देण्यात आले.

सोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्यांना गरज असेल अश्या १०५ नागरिकांना मलटिव्हिटॅमिन,कॅल्शिअम,अँटिपयरिटी सी,सिरप या सारख्या औषधी फिरते रुग्णालया मार्फत मोफत नागरिकांना देण्यात आल्या या साठी दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद व रोटरी क्लब दोंडाईचा यांचे मोठे सहकार्य लाभले, डॉ,हर्षल सोनवणे, निलेश जैन, सोनाली ईशी,रियाज मिरजा, यांनी नागरिकांची तपासणी करून उपचार दिला, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण सावळे,जितु कोळी,संजय कोळी,गणेश विसावे,चतुर कोळी यांनी मेहनत घेतली.

कार्यक्रम झाल्या नंतर शिवसेना व युवासेनेच्या वतीने तपासणी साठी आलेल्या डॉ,हर्षल सोनवणे,निलेश जैन,सोनल ईशी,रियाज मिरजा, यांचा पुष्प देऊन सत्कार करत आभार मान्यता आले, या वेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, युवासेनेचे तालुका प्रमुख आकाश कोळी, शहर प्रमुख सागर पवार,उपशहर प्रमुख गणेश विसावे,निखिल जयसिंघानी,योगेश बोरसे,शिवसेनेचे उपशहरप्रमुख आबा चित्ते,किरण सावळे,चुडामान बोरसे,दिपक मराठे,विजयी वाडील,राज ढोले,लखन मराठे,सुरेश कोळी,सचिन कोळी,विशाल कोळी जितु कोळी,संजय कोळी,बन्सी पुढारी,प्रकाश महाजन,चतुर कोळी,सनी कोळी,भारत कोळी उपस्थित होते