वंचित बहुजन आघाडीच्या मरसुळ शाखा अध्यक्ष पदी विनोद धोंगडे यांची निवड

38

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.16जुलै):-तालुक्यातील बहुजन चळवळी चे केंद्रबिंदु समजल्या जाणाऱ्या मौजा मरसुळमधे आज दि.15/07/2021 रोजी वंचित बहुजन आघाडी ची ग्रामशाखा तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणी राजाराम काकडे गजानन धोंगडे, शिद्धार्थ धोंगडे,भारत पाटील, यांच्या प्रमुख उपस्तीतीत स्थापन करण्यात आली.

ग्रामशाखा अध्यक्ष म्हणुन विनोद रमेश धोंगडे, यांची निवड करण्यात आली, उपाध्यक्ष अतुल खंदारे, आनंद सुरोशे,सचिव राजेश वाहुळे व संतोष धनसावंत,सहसचिव भिमराव धोंगडे, कोष्याध्यक्ष प्रविण खंदारे, संघटक गजानन शि.धोंगडे, सहसंघटक यशवंत धोंगडे, सल्लागार मिलिंद खंदारे, तर सदस्य म्हणून बबन धोंगडे, विशाल पडघणे,आनंदा खंदारे, शिद्धार्थ ना.धोंगडे, विजय भिमराव खंदारे, सुशांत धोंगडे, शिद्धार्थ गणपत धोंगडे, यांची निवड करण्यात आली, त्याप्रसंगी अरविंद धोंगडे यांनी बहुजनांना सत्तेत जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच सक्षम पर्याय आहे, असे सांगितले.