भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.16जुलै):- देवळा तालुक्यात येथे वादळी वारा आणि पावसामुळे मातीच्या घराची भिंत कोसळून पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू तर दोन जण गंभीर असल्याची घटना देवळा तालुक्यातील सावकी येथील आदिवासी वस्तीत घडली झोपेत असताना रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले देवळा तालुक्यातील सांगवी येथील आदिवासी वस्तीत पठाण कचरु सोनवणे राहणाऱ्या यांचे मातीचे घर आहे गुरुवार दिनांक 15 रात्री वादळी वारा आणि पावसामुळे मातीची भिंत कोसळून घरामध्ये झोपेत असलेले पठाण सोनवणे यांची पत्नी दबले गेले.

शेजारी ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेऊन ढिगार्‍याखाली दबलेल्या ना बाहेर काढले यामध्ये तिघांना गंभीर इजा झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना आकाश पठाण सोनवणे वय पाच या चिमुकल्या चा वाटेतच मृत्यू झाला तर सुनीता पठाण सोनवणे 27 व कुणाल पठाण सोनवणे 7 हे दोघे गंभीर जखमी झाले असून यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे तर पठाण सोनवणे 29 याला किरकोळ दुखापत झाली आहे या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सदर घटनेचा पंचनामा तलाठी कल्याणी कोळी ग्रामसेवक वैशाली पवार यांनी केला असून शासनाने तात्काळ या कुटुंबांना आर्थिक मदत करावी अशी ग्रामस्थांतर्फे मागणी करण्यात आली आहे