वडसा येथील पेट्रोल पंपवर केन्द्र सरकारचे विरोधात स्वाक्षरी मोहीम

26

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.16जुलै):-वडसा येथील पेट्रोल पंप याठिकाणी महीला काँग्रेस अनु- जाती विभागाच्या वतीने केन्द्र सरकार विरोधात घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला व स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.

केंद्र सरकारने जिवनाश्यक वस्तूंचे भरमसाठ भाव वाढ तसेच पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाववाढ केल्याबद्दल निषेधार्थ गडचिरोली जिल्हा अनुसूचित जाती महीला सेल तर्फे वडसा येथे आयोजित स्वाक्षरी मोहीमेला उपस्थित जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी, पंकज गुडेवार जिल्हा उपाध्यक्ष, सुदाम मोटवानी, काशिनाथ भडके जिल्हा अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार, शहजाद भाई शोला, राजू रासेकर, लताताई ढोक जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती महीला सेल गडचिरोली, आरती लहरी तालुकाध्यक्ष महिला अध्यक्ष वडसा, निलोफर शेख माजी उपाध्यक्ष नगरपरिषद वडसा, शुभांगी कवासे, योजना मेश्राम तालुकाध्यक्ष अनुसूचित जाती महिला काँग्रेस आरमोरी, सारिका दामले उपाध्यक्ष, रेश्मा रामटेके, दमयंती बारसागडे, शिल्पा मेश्राम, छाया रामटेके, निकिता मेश्राम, भारत रामटेके, प्रज्वला मेश्राम, रागिनी शेंडे व महीला पदाधिकारी व कार्यकर्त्यां उपस्थित होते.