युवा सेना विभाग युवा अधिकारी पोफळी परिसर उमरखेड पदी नासिर देशमुख यांची नियुक्ती

29

✒️अमोल जोगदंडे(विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.17जुलै):- शिव संपर्क अभियान अंतर्गत गाव तेथे शाखा आणि घर तथे युवा सैनिक या अतंर्गत उमरखेड तालुक्यातील पोफळी सर्कल यथे आज दिनांक १६/७/२०२१ रोजी ,शिवसेना जिल्हाप्रमुख माननीय परागभाऊ पिगंळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद पोफाळी गट-स्थळ गजानन महाराज संस्था पोफाळी यथे पार पडली. यावेळी नासिर जहांगीर मियाँ देशमुख रा.धनज यांची युवा सेना विभाग युवा अधिकारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थिती श्री. चीतंगराव कदम जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना सहसंपर्क प्रमुख उमरखेड विधानसभा क्षेत्र, सौ.निर्मला ताई विश्वनाथ विणकरे शिवसेना संघटिका जिल्हा यवतमाळ, रमेश आडे माजी बाधंकाम सभापती जिल्हा परिषद यवतमाळ, एडवोकेट बळीराम मुटकुळे शिवसेना उपजिल्हा प्रमुख, सतिश नाईक शिवसेना तालुका प्रमुख उमरखेड, संतोष जाधव शिवसेना श तालुका संघटक उमरखेड कपिल पाटील चव्हाण युवा सेना अधिकारी उमरखेड तालुका, गोपीचंद दोडके अनुसूचित जाती तालुका प्रमुख ,देवानंद पाचपुते अनुसूचित जमाती तालुका प्रमुख ,संजय झाडे, विष्णू चव्हाण, आदी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गोरगरीब जनतेच्या प्रश्नांसाठी शिक्षण, आरोग्य रोजगार यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू असे मत नासिर देशमुख यांनी अपले मत व्यक्त केले.