वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन तर्फे मूलनिवासी मुस्लीम मंचाचा सन्मान

29

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

पुणे(दि.17जुलै):-मार्च 2020 महिन्यात सर्वात प्रथम पुण्यामध्ये covid-19 आजाराने एक व्यक्ती मरण पावला. परिवाराच्या लोकांनी ते डेड बॉडी ताब्यात घेण्यास मनाई केली. प्रचंड भीतीचा वातावरण निर्माण झाला होता आजार नवीन असल्याने समजत नव्हते.उलट सुलट चर्चा सुरू होती. मेलेल्या माणसापासून पण संसर्ग होण्याची शक्यता आहे असे लोक समजू लागले.अशा बिकट प्रसंगी कुणीही पुढे येण्यास धजत नव्हते त्यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की परिवाराचे लोकांनी अंत्यविधी साठी नकार दिल्यास ते अंत्यविधी आपण करू.

तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की अंत्यविधीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांच्या मनात भीती आहे म्हणून सामाजिक संस्थेने या कामासाठी पुढे यावा असे आवाहन केले. सर्वात प्रथम मूलनिवासी मुस्लिम मंच हे महापालिकेच्या मदतीला धावली अधिकृतरित्या महापालिकेतर्फे काम सुरू केले. त्या दिवसा पासून तर आज रोजी पर्यंत संस्थेचे काम सुरू आहे.

पुणे शहरात कोरोना या आजाराने मरण पावलेल्या 1700 पेक्षा अधिक सर्व धर्मीय लोकांचे त्या त्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.महानगरपालिका व मृत व्यक्तींच्या कुटुंबाकडून पैसे न घेता सेवाभावी वृत्तीने आशीर्वाद मिळावा याकरिता संस्था काम करीत आहे.

मानव सेवेचा महान कार्य केल्याबद्दल मूलनिवासी मुस्लीम मंचाचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांच्या वतीने जागतिक स्थरावर सन्मान करण्यात आला.याप्रसंगी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन.प्रदेश उपाध्यक्ष. मेहबूब सय्यद,आदम सय्यद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड होल्डर.मराठी चित्रपट निर्माता श्री.सिकंदर सय्यद यांचे हस्ते मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांना सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.

मनोगत व्यक्त करताना अंजुम इनामदार म्हणाले की हा सन्मान त्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे ज्यांनी कोणतीच अपेक्षा न ठेवता पुण्यात कडक लॉक डॉन असताना चहा-नाश्ता हॉटेल्स सर्व बंद असताना शहरात प्रचंड भीतीचा वातावरण असताना अशा बिकट परिस्थितीत रात्र दिवस ही सेवा केली व आजही करीत आहे. आपण पुण्याचं काम केल्यामुळेच सर्व कार्यकर्ते सुरक्षित आहे म्हणूनच आपल्यापैकी कोणालाही संसर्ग झाला नाही किंवा कुटुंबात कोणालाही त्रास झाला नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.