काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालया चा शंभर टक्के निकाल

23

🔸यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

🔹शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व विदयार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा

✒️जालना जिल्हा प्रतिनिधी(अतुल उनवणे)

जालना(दि.17जुलै):-जिल्हा जालना बदनापूर तालुक्यातील काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालय येथील शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून संस्थेच्या वतीने सर्व यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या आहेत.

आखिल जगावर आलेल्या कोविड-19 या जागतिक महामारीमुळे सर्व क्षेत्रासह शिक्षण क्षेत्रातही कधीही भरून न निघणारे नुकसान विद्यार्थी आणि पालकांना सोसावे लागले आहे.कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नियमावली तयार करून शाळेत न येताही ऑनलाईन क्लासेस च्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात कायम राहण्यासाठी कसोशीने प्रयत्न करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिकदृष्ट्या नुसकान होऊ नये म्हणून शासनाने याचा विचार करून विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून शैक्षणिक धडे दिले व त्या आधारावर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल घोषित करण्यात आला.
*प्रतिभा माध्यमिक विदयालय,काजळा* शाळेचे एस.एस.सी. 2020-21 परीक्षेत यश मिळवलेले गुणवंत विद्यार्थी.

*गुणवंत विदयार्थी*

1. वैष्णवी विष्णू पैठणे 94.80%

2. सारिका लक्ष्मण पैठणे 92.40%

3. वैष्णवी भगवान खोटे 92.00%

4. गिता विठ्ठल महाडीक 90.80%

5. ऋतुराज प्रभाकर कोळेकर 90.40%

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे,पालकांचे व सर्व शिक्षक, कर्मचारी यांचे शाळेच्या व संस्थेच्या वतिने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

संस्थेचे सचिव:- माननीय सुदामराव आबासाहेब शिंदे
मुख्याध्यापक :- श्री.गुजर एस. एस सहशिक्षक मुळे डी.आर, पठाण डि.एल, धनगे बी.ए ,पाटील एस .एच , परजणे डी.व्ही ,कोळेकर पी.ए ,उनवणे एम.आर एल.आर कुर्हडे,गावडे पी .टी, टेके वाय.आर सर्व विद्यार्थ्यांचे कर्मचाऱ्यांच्या वतीने संस्थेच्या व शाळेच्या वतीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous articleसुपरस्टार राजेश खन्ना
Next article
Purogami Sandesh
पुरोगामी संदेश वेब पोर्टल पर प्रकाशित समग्री पर किसी प्रकार की आपत्ती/शिकायत होने पर purogamisandesh@gmail.com पर पंजीकृत की जायेगी ! संपादक/प्रकाशक के Whats App नंबर अथवा पोर्टल के कॅमेंट बाँक्स मे की गयी सूचना/शिकायत/आपत्ती का निपटारा किया जाए यह आवश्यक नही है ! - प्रकाशक/आपत्ती निवारण अधिकारी