उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मा. संदीप दादा बेडसे यांच्या हस्ते विधवा माता-भगिनींना साडी वाटप

26

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.22जुलै):- आज दि‌.२२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कणखर आवाज तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील विकास विद्यालयात विधवा माता भगिनींना धुळे जिल्हा राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष श्री संदीप दादा बेडसे यांच्या हस्ते साडी चे वाटप करण्यात आले. तसेच अजित दादा पवार यांचा वाढदिवस कष्टकरी महिलांच्या हस्ते साजरा करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजीत सिसोदे, तालुकाध्यक्ष डॉ कैलास ठाकरे, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश महाजन,युवक जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे, शिंदखेडा शहराध्यक्ष प्रविण पाटील, शिंदखेडा विधानसभा क्षेत्रप्रमुख दुर्गेश पाटील,माजी तालुकाध्यक्ष ललीत वारूडे, उपाध्यक्ष दिपक जगताप, उपाध्यक्ष चेतन देसले,पिरण बापू,बळवंत बापू सिसोदे,संदिप थोरात,अमृत भामरे,जिजाबराब अण्णा,मोहन जाधव,देवेंद्र पाटील ,भालचंद्र पाटील,छत्रपाल पारधी,कपील पाटील,संदीप सिसोदे,आनंदा पाटील ,महेंद्र सिसोदे,सतीश बेहरे,बाळा पवार,राजेश सिसोदे,सौरभ सिसोदे,सोहेब पटेल,फिरोज पटेल,परेश पाटील,रवी बापु,विक्की पाटील आदि उपस्थीत होते.