आमदार सुभाष धोटे यांच्या मतदारसंघातील जिवती तालुक्यात रस्त्याची दुरवस्था

28

🔹रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते

✒️शब्बीर सय्यद जहागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-9623896574

जिवती(दि.22जुलै):-चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या जिवती तालुका हा अतिदुर्गम आदिवासी बहुल भाग म्हणुन राज्यात ओळखला जातो जिवती तालुका राजुरा विधानसभा मतदारसंघात येत असुन या मतदारसंघाचे विद्यमान आमदारा चे राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे तरी पण स्वता च्या मतदारसंघातील जिवती तालुक्यातील रस्त्याचे बेहाल झाले आहे.तालुक्यातील जनतेला तहसील कार्यालयाच्या, पंचायत समितीच्या, बॅंकेच्या, व इतर कामानिमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी, किंवा बाहेर गावी जाण्या- येण्यासाठी या रस्त्याच्या खड्ड्यातुन दोन चाकी वाहने चार चाकी वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे पावसाळ्यामुळे रस्त्यावरच्या खड्ड्यात पाणी असल्याने खड्ड्याचा अंदाज लावणे कठीण झाल्यामुळे दररोज अपघात होत असल्याचे दृश्य दिसून येत आहे खड्ड्यात रस्ते आहे की रस्त्यात खड्डे आहे असे दृश्य निर्माण झाले असून जिवती तालुक्यातील रस्त्यावरचे खड्डे बुजविण्यात यावे आणि तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी सुशिक्षित नागरिकांनी प्रसिध्दी माध्यमांतुन या क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे यांना केली आहे