अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्यासाठी मदतीचे आवाहन

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मोबा.9075686100

सातारा(दि.24जुलै):-जिल्ह्यात गेले तीन ते चार दिवसांपासून विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असून अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरडी कोसळून त्यामध्ये घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने काही लोक बेघर झालेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या लोकांसाठी जनतेला मदतीचे आवाहन करणेत आले आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या लोकांसाठी तातडीने मदत पोहोचणे आवश्यक आहे.ब्लॅंकेट, चादरी तसेच बिस्किट, चिवडा फरसाण राजगिरा लाडू या स्वरूपामध्ये स्नॅक्स तसेच तांदूळ, आटा ,डाळ ,तेल ,तिखट मीठ इत्यादी कोरडा शिधा अशी मदत जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागात स्वीकारली जाणार आहे.

सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. ज्या लोकांना मदत करावयाची आहे अशानीसातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील श्री गंगातीरकर अव्वल कारकून ,पुरवठा शाखा मोबा.9423191011श्री दळवी, पुरवठा निरीक्षक सातारा, 8888487764 यांच्याशी संपर्क करावा व सढळ हाताने मदत करावी असे आवाहन करण्यात आले.