पाईपलाईन टाकण्याचा नावाखाली मुख्य रहदारीच्या रस्त्यावर खड्डे – नगरपालीकेवर मोर्चा काढण्यात दिला इशारा

27

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.26जुलै):- आज दोंडाईच्या नगरपालिकेत निवेदन देण्यात आले की,शहरातील मागील अनेक महिन्यांनपासुन मुन्ना चौक, गढी परिसर ,महावीर मेडीकल उतरती,पंचवटी चौक आदी परिसरात दोंडाईचा-वरवाडे नगरपालिका मार्फत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यासाठी वार्डातील मुख्य रहदारीच्या रस्त्यांचे खड्डे करत खोदकाम करण्यात आले आहे. मात्र ते काम काही ठिकाणी झाले तर काही ठिकाणी झाले नाही. म्हणून हे मुख्य रस्त्यावर खोदलेले खड्डे जैसे-थे आहेत. ह्या रस्त्यावरून दिवसभरात अनेक लहान-मोठे प्रवासी वाहने, पायदळी माणसे वावरत असतात.

त्यामुळे ह्या खड्ड्यामध्ये वाहनाचे चाक व माणसांचा तोल जावून आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झालेले आहेत. म्हणून भविष्यात मोठी घटना घडू नये. म्हणून आपण तातडीने ठेकेदारामार्फत खोदलेले खड्डे बुजविण्यात यावे,अन्यथा एखाद्याच्या शरिरास,जीवास ईजा- बरेवाईट झाल्यास त्याची सर्वशी जबाबदारी आपली राहील. म्हणून येणाऱ्या पंधरा आँगस्ट पर्यंत आम्ही चौकातील लोक काही मोठी भुमिका घेऊ,त्याअगोदर आपण हे काम नैतीक कर्तव्य समजत लवकरात लवकर करावे. असा इशारा वडाचे लोकांनी केला आहे त्यावेळेस उपस्थित मान्यवर मयूर भाऊ कोळी, कृष्ण भंडारकर, संदीप पवार, स्वप्निल भावसार, मोहित सोनवणे आदी उपस्थित होते.