पुढील काळात येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने लढणार -बाळकृष्ण देसाई

28

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.29जुलै):-दिनांक २८/०७/२०२१ रोजी दहिवडी, रेस्ट हाऊस येथे वंचित बहुजन आघाडीची येणाऱ्या आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकी संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी निवडणूक ही माण तालुका वंचित बहुजन आघाडी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि नगरपालिका पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी केला.यावेळी वंचितचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई व जिल्हा उपाध्यक्ष संजय करपे, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष उद्धव कर्णे यांचे मान तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले आणि सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या वेळी देसाई यांनी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले.कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी तयार रहावे निवडणूक ही पूर्ण ताकदीने लढवायची आहे असा संदेश कार्यकर्त्यांना दिला.

जिल्हा युवा अध्यक्ष उद्धव कर्णे यांनीही तळागाळातील युवा कार्यकर्ता वंचित बहुजन युवा आघाडी शी कसा जोडला जाईल त्यासाठी माण तालुक्यामध्ये मी जास्तीत जास्त वेळ देईल असे ते बोलताना म्हणाले.

सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष संजय करपे बोलताना म्हणाले की तालुक्या मध्ये येणाऱ्या काही काळामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषद,पंचायत समिती च्या इलेक्शन मध्ये माण तालुक्यामधून गटात व गणात वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार उभा करता येतील याकडे तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित झाले पाहिजे. तसेच जिल्हा संघटक इम्तियाज नदाफ यांनी तालुक्यांमध्ये कशाप्रकारे वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी,ओपन प्रवर्गातील मतदार वंचित बहुजन आघाडीशी जोडला जाईल यासाठी मोठ्या प्रमाणात माण तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून मतदारांचे संख्याबळ वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. वंचित बहुजन आघाडी माण तालुका अध्यक्ष युवराज भोसले यांनी यावेळी बरेच विषयावरती चर्चा केली व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

माण तालुक्याचे युवा नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष सनी तुपे बोलताना म्हणाले भविष्यात माण तालुक्यात युवा आघाडी चे मोठे संघटन उभे करू कुठल्याही पक्षांतर्गत कुठल्याही विषमतेला थरा न देता वंचित बहुजन आघाडीचे संघटन पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी घेऊन तालुक्यामध्ये काम करत राहू व येणाऱ्या काळामध्ये माण तालुक्यामध्ये “गाव तिथे शाखा आणि घर तिथे वंचितचा कार्यकर्ता” निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात करू व जास्तीत जास्त तरुण हा वंचितचा कार्यकर्ता झालाच पाहिजे हे ध्येय ठेऊ यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा आखणार असून येणाऱ्या काळात मान तालुका हा वचितचा तालुका म्हणून ओळख निर्माण केल्याशिवाय मान तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत.

या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असणारे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे सरचिटणीस माजी सरपंच वळई बजरंग वाघमारे, सचिव बंटी खरात, सहसंघटक मिलिंद भोसले, दहिवडी शहर अध्यक्ष राजू आवटे, मा.गट शिक्षण अधिकारी दिलीप भोसले, मा‌.सैनिक भारत रणदिवे वंचित बहुजन युवा आघाडीचे सल्लागार अशोक पवार, उपाध्यक्ष निखिल कुंभार, सरचिटणीस बाबा भोसले, सचिव नितीन सावंत, सचिव अमोल ऐवळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे शेवटी सरचिटणीस बजरंग वाघमारे यांनी आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.