हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन

25

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.30जुलै):-प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी १८ ऑगस्ट २०२१ रोजी आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै.बन्सीधर धोंडीबापु हंबर्डे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अ‍ॅड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षण व्यवस्थेलाही कोरोनाची बाधा,वाचनसंस्कृतीकडे तरुणांनी फिरवली पाठ,कृषी कायद्याच्या कचाट्यात शेतकरी,हे वक्तृत्व स्पर्धेचे विषय असून प्रथम,द्वितीय,तृतीय विजेत्यांना पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम अनुक्रमे रु.५००१,रु.३००१,रु.२००१,प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.

संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल सेठ मेहेर,प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन समितीमधे उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे,उपप्राचार्य अविनाश कंदले,डॉ.सखाराम वांढरे,डॉ.रवी सातभाई,प्रा.जे.एम.पठाण,प्रा.चंद्रकांत मडके,प्रा.विजय अग्रवाल,तानाजी रेडेकर,प्रा.महेंद्र वैरागे,प्रा.मनीषा देवगुडे परिश्रम घेत आहेत.

महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयासाठी ऑनलाइन स्पर्धा खुली असून कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील एकापेक्षा जास्त विद्यार्थी महाविद्यालयातून  सहभाग घेऊ शकतील.रजिस्ट्रेशन लिंक व इतर अधिक माहितीसाठी उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब मुटकुळे ९४२१३४०९५५,डॉ.सखाराम वांढरे ९७६७४२१३२३,डॉ.रवी सातभाई ९८५०४८८९४३ यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.