रफाई कॉलनी,दर्गा परिसर,अबूबकर कॉलनी,खाजाबाबानगर परिसरात घाणीचे साम्राज्य.नगरपरिषद प्रशासनाचे व नगरसेवकांचा दुर्लक्ष

27

✒️तालुका प्रतिनिधी(महादेव उप्पे)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.२९जुलै):- देगलूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील रफाई कॉलनी,दर्गा परिसर,अबूबकर कॉलनी,अहमदअली कॉलनी,खाजाबाबा नगर व इतर कॉलनी या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाणीकरिता पाईप लाईन अपुरी आहे. असलेल्या पाइपलाईनच्या भागांमध्ये नियोजन नाही,वेळेवर पाणी कधीच मिळत नाही, स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे.
प्रभागांमध्ये दुर्गंधी पसरलेली आहे डुकरांचा सुसाट जास्तीचे झालेले आहे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे .

त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. मागील वर्षभरापासून कोरोणा महामारी हा आजार पसरलेला आहे आपल्या शहरातील प्रभाग क्रमांक ३ मधील सर्वच भागात नगरपालिकेकडून पिण्याचे पाणी,स्वच्छतेचा बटयाबोळ आहे त्यामुळे या प्रभागामध्ये देगलूर शहराचा पहिला डेगूंचा रुग्ण आढळलेला आहे. कोरोणा होऊन ब्लॉक भंगसचा आजार देगलूर शहरात पहिला रुग्ण आढळून आला व तो मृत्यू पावला.

अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाईनच्या कामामुळे या भागातील अनेक रस्ते खोदण्यात आले परंतु रस्ते पूर्ववत न झाल्यामुळे नागरिकांना वृद्धांना रुग्णांना चालणे व फिरणे त्रासदायक झाले आहे पावसाळ्याचे चार महिने घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. अनेकजण गाडीवरून घसरून पडले पदचारी चालणारे व्यक्ती घसरून पडले दुखापतही झाली मुख्याधिकारी यांनी स्वतः या भागाची पाहणी करून नागरिकांना नागरी सुविधा पुरवून सहकार्य करावे असे निवेदनात सांगण्यात आले. या निवेदनावर शेख एहसान अब्दुल गणी सय्यद महोय्योदीन साहब, अहमदखान, शेख वहिद, सय्यद नदीम, मनजूर पठाण, शेख अजहर, शेख फरिद आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.