शहर विकास योजना कंत्राट विरोधात शुक्ला यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे धाव

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.1ऑगस्ट):-नगरपरिषद ब्रम्हपुरी मधील शहर विकास योजना आराखडा कंत्राट प्रकरणातील कलगीतुरा शिगेला पोहचला असून ऍड. दीपक(बाला) शुक्ला नियोजन सभापती न. प. ब्रम्हपुरी यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते श्री. मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे न्यायिक मागणी साठी धाव घेतल्याने संबंधित प्रकरणाला वेगळेचं वळण आले आहे.

नियोजन सभापती यांनी न. प. ब्रम्हपुरी मध्ये होणारा शहर विकास योजना आराखडा बेकायदा असल्याचे सांगत संबंधित लोकांवर अनेक आरोप केले असून पाच पट ज्यादा दराने कंत्राट मंजुरी देऊन, भ्रष्टाचाराचा कळस गाठत न. प.मुख्याधिकाऱ्यांनी नगरपरिषद सदस्यांची दिशाभूल केलेली आहे व केवळ भ्रष्ट मार्गाने पैसे कमावण्याच्या हेतू ने कारस्थान केले असल्याचे आरोप केलेत तर १९/०७/२०२१ ला महासंचालक , लाचलुचपत प्रतिबंध विभाग नागपूर परिक्षत्र तसेच राज्याचे महासंचालक , लाचलुचपत प्रतिबंध , वरळी , मुंबई तसेच अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंध चंद्रपूर व नागपूर यांचेकडे लेखी फिर्याद दाखल केली आहे.

मुख्याधिकारी श्री मंगेश वासेकर व इतर अधिकारी व पदाधिकारींनी या प्रकरणात केलेला भ्रष्टाचार हा दुधासारखा स्पष्ट असतांना मुख्याधिकाऱ्यांना वाचविण्याचा फार मोठा प्रयत्न व दबाव तंत्राचा वापर केल्या जात आहे . असेच वाचविण्याचे प्रयत्न चालू राहील्यास आम्ही हायकोर्ट व सुप्रीमकोर्टात लवकरच धाव घेवू असे नियोजन सभापती शुक्ला यांनी आक्रमक भूमिका घेतली असल्याने आता सभापती शुक्ला यांनी मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे धाव घेतली असल्याने संबंधित प्रकरणाला कुठला वळण येणार याची शहरातील नागरिकांना उत्सुकता लागली आहे.