वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदाराना निवेदन…

25

✒️अशोक हाके (बिलोली,ता.प्र.)मो.नं.9970631332

बिलोली(दि.2ऑगस्ट):-येथे देशात वाढत असलेल्या पेट्रोल,डिझेल व स्वयंपाकाचा गॅसच्या वाढत्या किमतीचा विरोधात व बिलोली तालूक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावे यासंदर्भात बिलोली तालूका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे…..देशात व राज्यात मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, व स्वयंपाकाचा गॅसच्या किमती वाढत असून त्यामुळे मध्यमवर्गीय नागरीकांचे आतोनात हाल होत आहेत तर एकीकडे केंद्र शासनाने अच्छे दिन आणण्याची घोषणा करीत आहे.

तर या उलट मध्यमवर्गीय नागरीकाना बुरे दिन आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.याबबतीत त्वरित केंद्र शासनाने निर्णय घेवून जीवनावश्यक वस्तूंचे दर सर्वसामान्य नागरीकांना परवडतील असे कमी करून नागरीकांना दिलासा द्यावा.तसेच बिलोली तालूक्यात दि.11 जुलै ते 21 जुलै पर्यंत तीन ते चार वेळेस मोठी अतिवृष्टी झाली त्यामुळे नदी नाल्यांना पुर येवून नदीकाठच्या शेतकऱ्यांचा शेतीतील उभी पिके मातीसह खरडून गेले तसेच अती पावसाळ्यामुळे पिके पिवळी पडून शेतकऱ्यांना अतिअल्प उत्पन्न होण्याची शक्यता आहे,त्यामुळे शेतीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन बिलोली तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीने नायब तहसीलदार ओमप्रकाश गोंड यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,जिल्हा सरचिटणीस संग्राम हयगले,गोसोद्दीन खुरेशी,तालूका अध्यक्ष नागनाथ पाटील सावळीकर,माजी.सभापती व्यंकटराव पांडवे,युवक तालूका अध्यक्ष रंजीत पाटील हिवराळे,नगरसेवक अनुप अंकुशकर,सामाजिक न्याय तालूका अध्यक्ष गंगाधराव प्रचंड, शहर युवक अध्यक्ष आनंद गुडमूलवार,शहराध्यक्ष अर्जूनराव अंकुशकर,महिला अध्यक्षा प्रतिभा पांडवे,लक्ष्मणराव देगलूरे,कुंडलवाडी शहराध्यक्ष नरसिंग जिठ्ठावार,उपाध्यक्ष शेख ईसमाईल, युवा अध्यक्ष अमरनाथ कांबळे,कुंडलवाडी अल्पसंख्याक शहराध्यक्ष शेख मुनीर,
सुरेश देसाई बाभळीकर,दस्तगीर नारायणगिर,नीळकंठ दुडले,सादिख पटेल,विकास पाटील दगडापूरकर,संतोष उत्तरवार,शेख मोहसीन,मारोतराव बोडके,बाबूराव गंजगावकर,राजेश बोडके आदींचा निवेदनावर स्वाक्ष-या आहे.