ढाणकी ते बिटरगांव -भांबरखेडा ते भांबरखेडा फाटा डांबरीकरण नव्याने करा..! अन्यथा रास्तारोको(चक्काजाम)आंदोलना चा इशारा

31

✒️सिध्दार्थ दिवेकर तालुका(प्रतिनिधी उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड(दि.5ऑगस्ट):- रोजी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव डी.के.दामोधर, जाँन्टीभाऊ विनकरे व सभापती संबोधी गायकवाड व तालुकाध्यक्ष संतोष जोगदंडे यांच्या नेतृत्वाखालीवंचित बहुजन आघाडीचे सार्वजनिक बांधकाम विभाग ऊमरखेड, जि.प. बांधकाम उपविभाग उपअभियंत्यास निवेदन देण्यात आले.

ढाणकी- ते-बिटरगांव व भांबरखेडा ते-भांबरखेडा फाट्यापर्यंत मुख्य डांबर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.रस्ता अत्यंत भयानक झालेला आहे. त्यामुळे याआगोदर सदर रस्त्यावर अनेक अपघात झाले असुन अनेकांना आपला जिव गमावावा लागला आहे.म्हणुन सदरील दोन्ही ठिकाणी नव्याने डांबरीकरण करण्यात यावे.जेणेकरून अपघाताचे प्रमाण कमी होईल.आणि दळवळणासाठी मार्ग सुकर होईल.अशा आश्रयाचे निवेदन देण्यात आले.

येत्या पंधरा दिवसाचे आत तातडीने निर्णय घेऊन डांबरीकरणाचे काम मार्गी लावावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने “चक्काजाम” आंदोलन करण्यात येईल.

असा ईशारा सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरखेड, आणी जि.प. बांधकाम उपविभाग उमरखेडच्या दोन्ही उपअभियंत्यास देण्यात आले.त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा महासचिव डी.के. दामोधर व जाँन्टीभाऊ विनकरे, यांच्या उपस्तीतीत संतोष जोगदंडे यांच्या नेत्रुत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी युवराज ब़डगर, राजुभाऊ खंदारे, सैय्यद हुसेन मौलाना, अथर खतीब, विष्णुकांत वाडेकर, दादासाहेब जोगदंडे, सुधाकर कदम,अमोल जोगदंडे, विनोद दवने, गंगाराम दवने, भारत कांबळे इत्यादी उपस्तीत होते.