राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजारांची मदत

40

🔸आ.सुरेश धस यांच्या मागणीला यश

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.6ऑगस्ट):;राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यक्रम,यात्रा,महोत्सव,जागरण,
गोंधळ,मोठे लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमास बंदी असल्याने गोंधळी समाज,शाहीर,हलगी,संभळ,तुतारी,
सनई वादक,लावणी कलावंत अशा कलेवर पोट असणाऱ्या सर्व कलावंत मंडळीवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली होती.

त्यामुळे आमदार सुरेश धस यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात कलावंतांना राज्य सरकारने विशेष पॅकेज जाहीर करावे अथवा मानधन सुरू करावे यासाठी मागणी केली होती.काल मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक भूमिका घेऊन संबंधित विभागाचे मंत्री व सचिव यांच्या उपस्थितीत २८ कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.त्याबद्दल राज्यभरातील कलावंत मंडळींकडून आ.सुरेश धस यांचे कौतुक होत आहे