सायकल चोरट्यापासून सावधान- स.पो.निरीक्षक आदित्य लोणीकर

38

✒️तालुका प्रतिनीधी(महादेव उप्पे)मो. नं.९४०४६४२४१७.

देगलूर(दि.7ऑगस्ट):- देगलूर तालुक्यातील मरखेल पोलीस स्टेशन परिसरातील शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक आणि पालक याना सूचना आहे की बऱ्याच शाळांमध्ये मुलांना व मुलींना सायकल वाटप करण्यात आले आहे. त्या सर्व सायकलीचा रंग एकच आहे. मानूर येथील शाळेतील एका मुलीची सायकल कोणीतरी शाळेतुन घेऊन गेली आहे. सर्व सायकलचा रंग एकच असल्यामुळे व सायकलला नंबर राहत नसल्यामुळे अशा सायकलचा शोध घेण्यास खूप अडचणी येतात.

त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी ज्या विध्यार्थी यांना सायकल वाटप केले आहे त्यांना सायकल वरती नाव टाकून घेण्यास सांगावे, तसेच सायकलला कुलूप बसवून घेण्यास सांगावे. पालकांनी विध्यार्थी मुलांना तात्काळ कुलूप बसवुन द्यावे आणि घरी आल्यावर देखील सायकल साखळीने कुलूप लावून ठेवावे. त्यामुळे सायकल चोरीला जाणार नाही. असे आवाहन मरखेल पोलीस स्टेशनचे स.पो.निरिक्षक आदित्य लोणीकर यांनी केले आहेत .