जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न

35

✒️विशेष प्रतिनिधी(अमोल उत्तम जोगदंडे)

धनज(दि.10ऑगस्ट):-जागतिक आदिवासी दिनानिमित्त रावण राजे बिरसा मंडळ धनज यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आदिवासी दिन साजरा केला. यावेळी देवानंद पाचपुते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष जाधव, डॉक्टर बालाजी मेंडके, दत्तप्रसाद जाधव ,साहेबराव वाळके,तलाठी जी.एस.मोळके, बापूराव धनवे पोलीस पाटील, अनाजी बोंबले, दिलीप वाळके ,प्रकाश आमलि,साहेबराव राठोड, आदी उपस्थित होते. संतोष जाधव व जयराम कराळे यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले .संतोष जाधव यांनी आदिवासी दिनाबद्दल 9 ऑगस्ट हा दिवस 1994 पासून जागतिक आदिवासी दिवस म्हणून संयुक्त राष्ट्र संघाने साजरा करण्यास सुरुवात केली.

आणि तेव्हापासून सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात येऊ लागला. असे आपले विचार मांडले तर जयराम कराळे यांनी आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे. कधीकाळी निसर्गपूजक आदिवासी समाजाने आपली संस्कृती आणि आपली अस्मिता ओळखून समाजाचे अस्तित्व जपण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. असे विचार मांडले आदिवासी हा मूलनिवासी आहे असे विचार मांडून आदिवासी संस्कृतीवर प्रकाश टाकला. आणि या दिनाच्या निमित्ताने करोना लसीकरण शिबिराचे आयोजन सुध्दा करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयराम कराळे तर आभार नासर देशमुख यांनी मानले.