चिपळुन आणि महाड पुरग्रस्त कुटुंबांना हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशनचा मदतीचा हात

23

✒️विशेष प्रतिनिधी(श्री मनोहर गोरगल्ले,राजगुरुनगर-खेड)मो.९७६७२१४६३४

राजगुरूनगर(दि.10ऑगस्ट):-९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मभुमी राजगुरुनगर मधुन हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातुन चिपळुण आणि महाड येथील पुरग्रस्त कुटुंबांना राजगुरुनगरकरांच्या वतीने एक हात मदतीचा देत एक महिण्याचा किराण्यासह जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करीत सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
अशा संकटसमयी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संघटनांनी पुरग्रस्तांना मदत करत तेथील कुटुंबांना आधार देण्यासाठी माणुसकी जीवंत ठेवली. गेली १५ दिवसांपासुन खेड तालुक्यातुन देखील अनेक सामाजिक संघटना यांनी देखील जमेल तशी मदत करुन सामाजिक कर्तव्य पार पाडले.

राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संचालक व हितचिंतक यांनी याकामी पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी राजगुरुनगर शहर आणि परिसरातुन मदत गोळा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. राजगुरुनगर शहर खेड तालुका पुणे जिल्हा राज्यातुन आणि परदेशातुन याकामी मोठ्या मनाने नागरिकांनी आर्थिक व वस्तुरुपी सहकार्य केले.

जमा झालेल्या आर्थिक रक्कमेतुन २५ वस्तुंचे परिपुर्ण १५१ किराणा किट तसेच जमा झालेल्या जीवनावश्यक वस्तुंचे ( नवीन साड्या, पाणी बॉक्स, ब्लॅंकेंट. चटया, लहाण मुलांचे कपडे, फिनेल, व इतर वस्तु ) यांचे वाटप ९ ऑगस्ट २०२१ क्रांतीदिनाच्या दिवशी चिपळुन आणि महाड परिसरात हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनचे संचालक हितचिंतक यांनी स्व:ता जाऊन सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पुरग्रस्त गरजु कुटुंबांना वाटप केले. सर्व मदत पोहोच करुन आपली जबाबदारी कर्तव्य पार पाडल्याचे समाधान सर्वांना मिळाले.

याकामी हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन या सामाजिक संस्थेवर ज्ञान अज्ञात अनेक दानशुर लोकांनी खुप मोठा विश्वास ठेवुन मदत केली त्याबद्दल राजगुरुनगरकर व सर्वांचेच मनपुर्वक आभार व्यक्त करत आहोत. पुरग्रस्तांना मदत मिळावी या करीता नियोजन करणाऱ्या हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशनच्या सर्व संचालकांचे व हितचिंतकांचे करावे तेव्हढे कौतुक आणि मानावे तेव्हढे आभार कमीच आहे. संकटाच्या वेळी मदतीला धावुन जाण्यातआणि माणुसकीचा धर्म पाळुयात. हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन राजगुरुनगर हे सतत समाज कार्य करत आसते.