मानवतेचा धागा घट्ट करणेसाठी* आदिवासी संस्कृती मार्गदर्शक – ऍड. सुरेखा दळवी

29

✒️पूणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.10ऑगस्ट):-जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिम संस्था व एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, नुकताच जागतिक आदिवासी दिन पुणे शहरात पार पडला.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील, ठाकर समाजाचा, सामाजिक-आर्थिक अभ्यास आदिम संस्थेच्या वतीने मागील दोन महिन्यापूर्वी करण्यात आला होता.

या अभ्यासातून समोर आलेले प्रमुख निष्कर्ष यावर चर्चा विनिमय करून पुढील दिशा ठरवण्याचे काम या कार्यक्रमात करण्यात आले,

सदरील अहवाल व त्यातील ठळक निरीक्षने याविषयी मांडणी आदीम संस्थेचे संशोधक किरण लोहकरे यांनी केली, तर जागतिक आदिवासी दिनानिमित्त एस.एम.जोशी सोशालिस्ट फौंडेशनचे विश्वस्त सचिव प्रा.सुभाष वारे व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष ऍड.नाथा शिंगाडे यांनी आपले मनोगत मांडले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष ऍड.सुरेखा दळवी यांनी आदिवासी संस्कृती, ठाकर समाजाचे स्वभाववैशिष्ट्य व त्यांचे मूलभूत प्रश्न याविषयी सविस्तर मांडणी केली, ठाकर समाजाच्या मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कायद्याची मदत व संघटनशक्ती यांच्या एकत्रित मिलाफातून भिडण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले..

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.युवराज काळे,पाहुण्यांचे स्वागत, आशा लोहकरे व दत्ता मावळे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.हनुमंत भवारी यांनी केले व ठाकर समाजाच्या सर्वेक्षण विषयी अनुभव प्रा.स्नेहल साबळे यांनी मांडले व शेवटी आभार डॉ.अमोल वाघमारे यांनी मांडले.
—–

ठाकर आदिवासी समाजाच्या अभ्यासातील ठळक निष्कर्ष

 

आंबेगाव तालुक्यातील 13 ठाकरवस्तीतील सुमारे 298 कुटुंबाचे सर्वेक्षण करून समोर आलेली तथ्ये

1.आंबेगाव तालुक्यातील ठाकर समाजात भूमिहीन कुटुंबांचे प्रमाण 40 % असून, अल्पभूधारकांचे प्रमाण 50% आहे.

2.ठाकर समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी असून जवळपास कुटुंबप्रमुखांचा साक्षरता दर 56 % असून तो राज्याच्या 65% पेक्षा
9 % ने कमी आहे .

3.ठाकर समाजाच्या कुटुंबांचे सरासरी मासिक उत्पन्न देशाच्या व राज्याच्या सरसरीपेक्षा तीन पटीने कमी म्हणजे 2338 रुपये आहे .

4.आंबेगाव तालुक्यातील ठाकर समाजातील
90 % कुटुंबांना स्वताच्या मालकीचे घर असले तरी त्यापैकि
54 % कुटुंबांच्या घराखालच्या जमिनी ह्या इतर समाजातील लोकांच्या मालकीच्या आहेत. त्यामुळे अशा कुटुंबात घराच्या जमिनीवरून  कायम चिंतेचे वातावरण असते.

5.रोजगार हमी योजना व आयुष्यमान भारत योजना याविषयी लोकांना माहिती नाही.  जवळपास 80 % लोकांकडे जॉब कार्ड नाहीत.

6.सर्वच ठाकर वस्त्यांवर रॉकेलचा प्रश्न गंभीर असून 91 % कुटुंबांनी  ते मिळत नसल्याचे नमूद केले आहे.

7.जवळपास सर्वच ठाकर वस्त्यांवर पिण्याचे पाणी, रस्ते , दफनभूमी याविषयी लोकांना अनेक समस्या आहेत.