जांभुळघाट-आंबेनेरी भिसी रोडची दुरुस्ती करून त्वरित उपाययोजना करा- शुभम मंडपे यांची मागणी

107

🔹सार्वजनिक बांधकाम उपविभागाला दिला रास्ता रोको आंदोलनाचा इशारा

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.13ऑगस्ट):-जांभुळघाट-आंबेनेरी भिसी रोडवर खूप मोठे मोठे गड्डे पडलेले आहेत व या गड्ड्यांमुळे विध्यार्थ्यांना शेतकऱ्यांना व शेतमजुरांना व प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे तरीपण याकडे सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुडे *आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांनी जांभुळघाट-आंबेनेरी भिसी या मार्गाची दुरुस्ती करून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे व सार्वजनिक बांधकाम उपविभागाला निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

ह्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व हे रस्तावरील गड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत या मार्गाने जांभुळघाट , पारडपार , आंबेनेरी ,बोरगाव बुट्टी , कपर्ला भिसी शेतकरी व शेतमजूर व अन्य प्रवासी जात असतात व हा मार्ग चिमुर वरून उमरेड ला जाण्यास मुख्य मार्ग आहे तरी मात्र या रस्त्याकडे सर्वांजिक बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे तरीबजांभुळघाट-आंबेनेरी भिसी या मुख्य मार्गाची व रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून उपाययोजना करावी अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर येथे देण्यात आले यावेळी आंबोली ग्रामपंचायत सदस्य व सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे , सामाजिक कार्यकर्ते मनोज राऊत , भाग्यवान नंदेशवर , आशिष बोरकर , निलेश गावंडे , अमर ठवरे ,संदीप बन्सोड , प्रफुल तांबे ,संजय खोब्रागडे किशोरजी गेडाम ,निलेश कोहिचाडे , रशिया पोपटे , शुभम टेंभुर्ण उपस्थित होते