महाराष्ट्र ग्रामीण बॅंक समोर अमरण उपोषणास प्रारंभ

30

✒️सिरसाळा(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिरसाळा(13ऑगस्ट):-शेतक-यांना नवीन पिक कर्ज प्रकरण वाढवून द्यावे व नवीन पिक कर्ज तात्काळ करावीत या मागणीसाठी सिरसाळा येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅंक समोर अमरण उपोषणास प्रारंभ झाला आहे.

उपोषण स्थळी मुन्ना काळे सर,बाळासाहेब पांडे, मिलिंद चोपडे, धर्मा मेंडके, राजेभाऊ ऊजरे, रवि भैय्या चाटे,भगवान कदम आदी बसले आहेत यावेळी , जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब किरवले, आबा कराड,गोविंद राव होनमने, बाळू भैय्या सोळंके यांनी भेट दिली आहे. शेतक-यांच्या हिताच्या मागण्या घेऊन हे अंदोलन सुरु आहे. जो पर्यंत मागण्या पुर्ण होत नाहीत तो पर्यन्त अमरण उपोषण सुरुच राहिल अशी प्रतिक्रिया उपोषण कर्ते मुन्ना काळे सर यांनी दिली आहे.