जालिंदर यशवंतराव काळे यांचे अल्पशा आजाराने निधन

53

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.15ऑगस्ट):-कडा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिलीपराव काळे यांचे बंधू व मा.आ.भीमसेन धोंडे यांचे स्वीय सहायक तुषार काळे यांचे चुलते जालिंदर काळे यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी अहमदनगर येथे उपचारादरम्यान दि.१४ ऑगस्ट रोजी निधन झाले आहे.

फत्तेवडगाव ता.आष्टी येथील मुळ रहिवाशी असलेले सध्या आष्टी येथे वास्तव्यास असणारे जालिंदर काळे यांचा मोठा परिवार असून जेष्ठ बंधू सेवानिवृत्त केंद्रप्रमुख प्रल्हाद काळे सर, कडा सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक दिलीपराव काळे, इंजिनिअर झुंबर काळे व राजेंद्र काळे जहाँगीर हॉस्पिटल पुणे येथे जनरल मॅनेजर, महादेव काळे मुख्याध्यापक असून जालिंदर काळे हे शेती करत होते.अत्यंत शांत स्वभाव असलेले जालिंदर काळे हे काका नावाने परिचित होते.उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने दि.११ ऑगस्ट रोजी अचानक रक्तदाब वाढल्याने मेंदूमध्ये रक्तस्राव झाला.

अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल केले परंतु डॉक्टरांनी सर्व चाचण्या करुन यावर उपचार होऊ शकत नसल्याचे सांगितले तसेच अमेरिकेत शास्त्रज्ञ असलेले पुतणे डॉ.विजय काळे यांनी अमेरिकेतील तज्ञ डॉक्टरांचा देखील सल्ला घेतला मात्र त्यांनीही उपचार होऊ शकत नसल्याचे सांगितले.तीन दिवस अहमदनगर येथे दवाखान्यातील अतिदक्षता विभागात मृत्यूशी दिलेली झुंज अखेर संपली आणि दि.१४ रोजी दुपारी ३ वाजता जालिंदर काळे यांचे निधन झाले.त्यानंतर सायंकाळी ६ वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात फत्तेवडगाव ता.आष्टी येथे अंत्यविधी झाला.

शेतकरी असलेल्या स्व.जालिंदर काळे यांना एक विवाहित मुलगा सचिन असून वसुंधरा विद्यालय आष्टी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर एक अविवाहित मुलगी प्रियंका हि सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तिची स्वतःची पुणे येथे आयटी कंपनी आहे.तर त्यांच्या पश्चात परिवारात आई,चुलते,पत्नी,पाचभाऊ,भावजई,पुतणे,पुतण्या,सुना,जावई,नातवंड असे उच्चशिक्षित एकूण ३८ सदस्यांचे कुटुंब असलेला मोठा परिवार आहे.काळे परिवारराजकीय,सामाजिक,शैक्षणिक,धार्मिक अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याने अंत्यविधीसाठी वरील सर्वच क्षेत्रातील मित्र,नातेवाईक,आप्तेष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते,तर स्व.जालिंदर काळे यांचा दशक्रिया विधी सोमवार दि.२३ ऑगस्ट रोजी फत्तेवडगाव ता.आष्टी येथे होणार आहे.