सावरगाव बंगला येथे आरोग्य सेविकेचा कोविड योध्दा म्हणून सत्कार

27

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15ऑगस्ट):- ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव (बं) येथे कोविड-१९च्या काळात आपल्या जीवाची परवा न करता कार्य करणाऱ्या आरोग्यसेविकेचा कोविड योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला.

सर्वप्रथम सरपंचा वनिता बरडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.

यावेळी सरपंच वनिता बरडे, उपसरपंच विक्रम राठोड, पोलीस पाटील स्वाती दीपरकर, सचिव डि.एस. गरड,तंटामुक्ती अध्यक्ष पंजाब चव्हाण,तलाठी गुंडवाळे साहेब, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.स्नेहल काकडे,मान्यंवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती, व प्रतिष्ठित गावकरी मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड -१९ च्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे व कोविड-१९ लसीकरणातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आरोग्य सेविका कु.मिनाक्षी लक्ष्मणराव मंदाडे ह्यांचा शाल व श्रीफळ देऊन यांच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साहेबराव साखरे हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्व ग्रा. पं.सदस्य, शिक्षक वृंद ,आशा सेविका,अंगणवाडी सेविका, कर्मचारी जलसुरक्षक डाटा ऑपरेटर तसेच अनिल काष्टे, सोनबा काष्टे,लक्ष्मण दिपरकर,विलास राठोड, भारत बरडे, तसेच इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बी.एन.जोगदंडे तर आभार रामधनी सर यांनी मानले.