भ्रष्टाचार नियंत्रण न्याय महासंघाच्या जिल्ह उपाध्यक्षपदी विजय भोसले यांची निवड

20

✒️सुरेश राठोड(कोल्हापूर प्रतिनिधी)

कोल्हापूर(दि.20ऑगस्ट):-ज्योतिबाच्या पायथ्याशी वसलेले करवीर तालुक्यातील कळंबा या गावचे सुपुत्र विजय भोसले यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन त्यांना मानवाधिकार न्याय महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय महासंघ या भारत सरकार च्या कायद्याने नोंदणीकृत असलेली नवी दिल्ली येथील केंद्रीय गुन्हा भ्रष्टाचार नियंत्रण महासंघाच्या वतीने कोल्हापूर, कळंबा येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांची कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

याबाबतचे निवृत्ती पत्र राज्य महासंघाचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल मदने यांनी दिले. विजय भोसले यांचे समाजाप्रती असणारे प्रेम धडपड, दुसऱ्याच्या मदतीला धावणारे व्यक्तिमत्व व सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी विशेष सहकार्य राज्य उपाध्यक्ष सतीश खोत, सहा अध्यक्ष राजन जोशी, महासंघाचे सचिव ऍड. अनिल पाटील, सूर्यदर्शन चव्हाण यांचे लाभले.

यावेळी सुरेश रावण, नंदकुमार पाटील, गोविंद अंगडा, मयूर भोसले, संजय पाटील, विष्णू हुजरे, प्रशांत रावण, रोहन परांडेकर, संग्राम यादव आदींनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणावरून भोसले यांना शुभेच्छा देत आहेत व शुभेच्छां बरोबर आपल्यासारखा व्यक्ती राजकारणामध्ये असावा अशी मागणी जनसमुदायातून होत आहे.