राष्ट्रीय महामार्ग क्र.७ हिंगणघाट तालुक्यातील दारोडा रोडवर खड्डयाचे साम्राज्य?

22

 

हिंगणघाट(दि.20ऑगस्ट):- तालुका मध्ये येत असले दारोडा या गावी राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर पोहणा येरला वडकी येथे उड्डाण पुल देण्यात आला,या पुलावर जिव घेणे खड्डे पडले आहे, गेल्या पाच महीण्या मध्ये याच पुलावर बरेच अपघात झाले आहे.या रोड चे काम अर्धवट केले दोन ते तिन वर्षा मध्ये या रोड चे काम हलक्या दर्जा चे झाले आहे. हिंगणघाट हायवे क्रमांक ७ हा चौवीस तासनतास वरदळ चालू असते , नागपूर , हैदराबाद, आदिलाबाद , सगळीकडे ,कोरोना कमी होताच गाड्यांची सुसाट गर्दी वाढली , रोड नि चौविस तास सुरु असनारा हा राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर दळण वळण जास्त असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले.

परंतु लॉकडाऊन संपल्या नंतर हा राष्ट्रीय महामार्ग नेहमी प्रमाणे सुरु झाला,या रोडवर जास्त अपघात होत असल्याने नागरिक त्रस्त झाले , टोल नाक्या जवळ दारोडा या ठिकाणी दोन वेळा ट्रक रस्त्या मध्ये खड्डे असल्यामुळे नियंत्रण सुटून उडाण पुलाच्या खाली हादरला यात ड्रायव्हर चा डोक्याला गंभीर मार लागला , टुव्हीलर फॉर्व्हिलर अनेक जीव त्या ठिकाणी गेले , तरी या रोड कडे दुर्लक्ष असल्यामुळे प्रशासन लवकरात लवकर शासनाने रोड चे खड्डे बनवावे अशी मागणी ,लोकप्रतिनिधी व नागरिक करीत आहे ,