चुकीचे ‘कोळी’ आडनाव लावले असेल तर दुरुस्त करा- प्रा.मोतीलाल सोनवणे

102

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)

धुळे(दि.22ऑगस्ट):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या अनुसूचित जमातीच्या यादीतील क्रमांक २८,२९ व ३० वर असलेल्या कोळी, ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार या आदिवासींना अनुसूचित जमातीच्या (scheduled tribes) सवलती दिलेल्या आहेत. या आदिवासी जमाती मध्ये कोळी हे आडनाव अस्तित्वात नाही. पूर्वीचे त्यांचे आजोबा-पणजोबा अडाणी, अज्ञानी होते. म्हणून चुकून आडनाव कोळी लावले असेल तर शासकीय प्रेस चर्नी रोड मुंबई येथून दुरुस्ती करून घ्यावी.

(सायबर कॅफे मधुन कुठूनही दुरुस्ती करता येते.) एका कुटुंबात एकच आडनाव ठेवा. संविधानानुसार कोळी ढोर किंवा टोकरे कोळी, डोंगर कोळी किंवा कोळी महादेव, कोळी मल्हार अशी नोंद केली तर जातीचा दाखला काढताना व वैधता दाखला काढताना कोणतीही अडचण येणार नाही. एका कुटुंबात अज्ञानामुळे दोन दोन आडनावे आढळून येतात. जातीचा दाखला व वैधता दाखला देणारे अधिकारी आडनावे  जुळून येत नाही. म्हणून मुद्दाम, हेतूपुरस्सर जातीचा दाखला नाकारतात. कोळी आडनाव लावल्यामुळे मुंबईची आगरी-कोळी ( O.B.C,/S. B  C) वाटतात. म्हणून कोणीही कोळी आडनाव लावू नका. स्वतःच्या कुटुंबाचं नुकसान करू नका. दलित समाजाचा आदर्श घ्यावा. दलित जातीचे लोक कधीच महार आडनाव लावत नाही. त्यांचे जे खरे आडनाव असेल तेच लावतात. संविधानानुसार खऱ्या जातीची नोंद करतात. त्यामुळे त्यांना कोणतीच अडचण येत नाही