फ्लेक्स प्रिंटिंगमध्ये अल्पावधीत बोडखे पॅटर्नचा दबदबा !

45

✒️सौ.सरस्वती लाड(आष्टी,जिल्हा प्रतिनिधी)

आष्टी(दि.22ऑगस्ट):-गुणवत्ता,व्हरायटी,दर्जा,योग्यभाव आदीसह ग्राहकांच्या सेवेत आधुनिक स्वरूपात सहज उपलब्ध असलेले छपाई प्रिटींगसह शालेय आणि महाविद्यालयीन छपाई,बँका,पतसंस्था आणि निवडणुकीचे पोस्टर्स,स्टिकर्स आदी विविध क्षेत्रांसाठी निर्माण झाले आहे. बीड- अहमदनगरसह विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी जाण्याच्या संदर्भामध्ये सातत्याने व्यवसायिकांना वेळ,खर्च लागत असे ही उणीव सातत्याने लक्षात घेऊन बोडखे बंधू यांनी प्रत्यक्ष आष्टी शहरांमध्ये आधुनिक सेवा उपलब्ध करून दिली आहे.विविध प्रकारच्या छपाई प्रिटींगसह शालेय आणि महाविद्यालयीन स्टेशनरी छपाई विविध प्रकारच्या राष्ट्रीय आणि खाजगी बँका तसेच पतसंस्थांसाठी स्टेशनरी प्रिटिंग उपलब्ध झाली आहे.

विविध प्रकारच्या निवडणुकांचे पोस्टर्स, पोम्प्लेट,स्टिकर्स त्याचबरोबर आधुनिक फ्लेक्स प्रिंटिंग यामध्ये बॅनर आणि बोर्ड यांचा समावेश असून शहर आणि तालुक्यातील अनेक हॉस्पिटल्सच्या फाइल्स, रिपोर्ट्स आणि लॅब रिपोर्ट, स्टेशनरी प्लॅस्टिक प्रिंटिंग यामध्ये बोडखे पेटर्न अल्पावधीत धबधबा निर्माण करू शकला आहे.सामाजिक बांधिलकीचा अंतर्भाव असलेल्या बोडखे प्रिंटिंगमध्ये अखंड हरिनाम सप्ताह,पोम्प्लेट,पोस्टर छपाई त्याचबरोबर भेट वस्तू आणि फोटो फ्रेम अत्यंत गुणवत्तापूर्ण आणि अल्पावधीत देण्याचे भाग्य बोडखे प्रेसला मिळाले आहे.आधुनिक प्रकारच्या सफाई प्रिंटिंगसह डिजिटल ऑफसेटला ग्राहकांची मोठी पसंती आहे.

एकंदरीतच, उद्योग क्षेत्रामध्ये पदार्पण केलेल्या बोडखे पॅटर्नमुळे सर्वसामान्य ग्राहक आदीसह शेतकरी आणि लघु,कुटिर उद्योगांच्या मालकांना या प्रेसमुळे वेळ,पैसा आदीसह शारीरिक कष्ट वाचू शकले आहे.दरम्यान काही दिवसापुर्वीच पालकमंत्री धनंजय मुंडे,आ.बाळासाहेब आजबे,आ.सुरेश धस,माजी आ.भीमसेन धोंडे,दैनिक झुंजारनेताचे संपादक आजितदादा वरपे,कार्यकारी संचालक आकाश वरपे,ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल,अ.भा.वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले,राधाताई महाराज,सोनाली दिदि करपे,सामाजिक,राजकीय,शिक्षण,पत्रकारिता,धार्मिक,प्रेलाईन,मिडीया,विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बोडखे प्रेसला आवर्जून भेट देत बोडखे आॕफसेटचे मालक दत्ताभाऊ बोडखे यांचे आवर्जून कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
आकाश डोंगरे,(आष्टी)