ऑनलाइन डान्स स्पर्धेचे पारितोषिक वितरण

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.23ऑगस्ट):-भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लायन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या वतीने देशभक्तीपर ऑनलाइन सोलो डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेतील विजेत्या व सहभागी स्पर्धकांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम दिनांक 22 ऑगस्ट रोजी शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल याठिकाणी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रदीप गुंडाळे, उद्घाटक अरविंद लांडगे, प्रमुख पाहुणे म्हणून अंबादास राठोड, डॉ.मनिष काकानी, गोपी मुंडे, रामेश्वर तापडिया यांच्यासह लायन्स क्लबचे अध्यक्ष अतुल गंजेवार, कोषाध्यक्ष महादेव गीते, लायन्स क्लब सर्विस चेअर पर्सन गोपाळ मंत्री, सहसचिव अभिनय नळदकर यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धा बालकुमार गट व खुला गट अशी दोन गटात घेण्यात आली.

या ऑनलाइन स्पर्धेमध्ये जवळपास 60 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. बालकुमार गटात सर्वप्रथम समृद्धी काळे, द्वितीय संस्कृती फड, तृतीय आर्या गुंडाळे तर खुल्या गटात प्रथम वर्धा येथील समीर मेश्राम, द्वितीय गौरी कुरुंदकर ,तृतीय प्रियंका अवचार या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले .यशस्वी विद्यार्थ्यांना लायन्स क्लबच्या पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोख रक्कम अशा स्वरूपात गौरवण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक गोपी मुंडे यांनी काम पाहिले.

याप्रसंगी काही निवडक विद्यार्थ्यांनी आपले नृत्य सादर केले. तर समर्थ गोपी मुंडे या लहान मुलाने स्पर्धेतील सहभागी कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून अतिशय सुंदर असे भाषण केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाळ मंत्री तर आभार प्रदर्शन संभाजी वाडेवाले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगत सुरवसे, उमेश पापडू, संजय तापडिया, तुषार उपाध्याय आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी बहुसंख्य लायन्स क्लब सदस्य उपस्थित होते.