एकच निर्धार ,17 जागा लढवणार- रयत मित्र मंडळाचा नगरमध्ये एल्गार

27

🔸वार्षिक सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा रयत सेवक मित्र मंडळाची दमदार हजेरी

✒️अहमदनगर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

अहमदनगर(दि.23ऑगस्ट):-रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांच्या हक्काचे व्यासपीठ असणाऱ्या रयत सेवक मित्र मंडळ या संघटनेची वार्षिक सभा राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहमदनगर येथे कोविड नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न झाली.सर्वप्रथम रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक *पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील व कर्मवीर शंकरराव काळे साहेब* यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्री. शरद यादव सर, संघटनेचे मार्गदर्शक व रयत सेवक को. आॕप. बँकेचे माजी चेअरमन श्री. बी. पी. बोलगे सर, प्रमुख पाहुणे रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. शिवाजीराव तापकीर साहेब, रयत सेवक मित्र मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री. नंदकिशोर गायकवाड सर, उपाध्यक्ष श्री. मच्छिंद्र पिलगर सर व श्री. खंडू कांबळे सर आणि उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

कोरोना जागतिक महामारीमध्ये दिवंगत झालेले रयत सेवक मित्र मंडळाचे मार्गदर्शक *प्रा. तुकाराम दरेकर सर, विजयराव निकम सर तसेच रयत शिक्षण संस्थेतील सेवक व रयत शिक्षण संस्थेशी जोडले गेलेल्या सर्व ज्ञात अज्ञात मयत व्यक्तींना रयत सेवक मित्र मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली* अर्पण करण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेत विविध *स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा तसेच उपस्थित नवनियुक्त मुख्याध्यापकांचा* यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

रयत सेवक मित्र मंडळाचे अध्यक्ष *श्री नंदकिशोर गायकवाड* सर यांनी रयत मित्र मंडळ संघटनेने वेळोवेळी केलेल्या मागण्यांमधील प्रामुख्याने *नियमानुसार व पारदर्शक बदली प्रक्रिया, सेवाजेष्ठतेबाबत कायदेशीर अंमलबजावणी, पारदर्शी पदोन्नती प्रक्रिया, कलाशिक्षक पदवीधर वेतनश्रेणी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब, उपाध्यक्ष, चेअरमन मा. डॉ. अनिल पाटील साहेब, व्हा.चेअरमन, सर्व मॕनेंजिंग कौन्सिल सदस्य व सर्व जनरल बॉडी सदस्य, समन्वय समिती सदस्य, सचिव मा. शिवणकर साहेब, सहसचिव मा. नागपुरे साहेब (माध्यमिक), सहसचिव (उच्चशिक्षण), सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व विभागीय अधिकारी, सर्व सहायक विभागीय अधिकारी, संस्थेचे सर्वच पदाधिकारी व अधिकारी या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव* संघटनेच्या वतीने मांडून जाहीर अभिनंदन केले. संस्था प्रशासन आणि संघटना यामध्ये नेहमीच संघर्ष होत असतो. मात्र सेवकांच्या प्रश्नासाठी प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले असल्यामुळे संघटना म्हणून आम्ही याचे स्वागत करतो आणि भविष्यात अशाप्रकारे प्रशासनाचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. *सर्वानुमते या ठरावास अनुमोदन* देण्यात आले

प्रमुख उपस्थिती म्हणून रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग अहमदनगर विभागीय अधिकारी मा. *श्री शिवाजीराव तापकीर साहेब* यांनी *संस्थेचे पारदर्शी प्रशासन व गुणवत्ता वाढ याविषयी मार्गदर्शन केले. सेवकांचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी संघटना व संस्था प्रशासन यांच्यामध्ये समन्वय आवश्यक असल्याचे* मत त्यांनी व्यक्त केले.
रयत सेवकांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. *निवृत्त सेवकांचे निवृत्तीवेतन प्रस्ताव, प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक या पदोन्नती दिलेल्या सेवकांचे मान्यता प्रस्ताव, निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी, कलाशिक्षक पदवीधर वेतनश्रेणी प्रस्ताव तातडीने शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे मान्यतेसाठी पाठवणे व मान्यता घेणे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नती प्रक्रिया, आश्रमशाळा विभागातील सेवकांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडे बदल्या, अर्धवेळ, विनाअनुदानित, लमसम रयत सेवकांच्या नियुक्ती, डी.एड. शिक्षकांना बी.एड. अथवा पदवीधर वेतनश्रेणी* या प्रशासकीय तसेच *रयत सेवक बँक सभासद लाभांश, सहकारी बँकेच्या तुलनेत कमीत कमी व्याजदर, मयत सभासद व त्यांचे जामीनदार यांच्या समस्या, अतिरिक्त मधून आलेल्या सेवकांना रयत बँकेचे सभासद करून सभासद संख्या वाढवणे* याविषयी चर्चा करण्यात आली. रयत सेवक को. ऑप. बँकेच्या आगामी निवडणूकीविषयी सविस्तर चर्चा करून *आगामी निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा संघटनेच्या वतीने लढवण्याचा ठामपणे निर्णय* घेण्यात आला. प्रमुख पाहुणे रयत बँकेचे माजी चेअरमन *श्री बी.पी. बोलगे सर तसेच मार्गदर्शक प्रा. रामचंद्र डोळे सर, उपाध्यक्ष मा. श्री. मच्छिंद्र पिलगर व मा. श्री. खंडू कांबळे सर* यांनी रयत बँकेसंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या सेवकांसोबत चर्चा करून पुढील रणनीती ठरविण्यात आली.
मेळाव्याचे अध्यक्ष व संघटनेचे मार्गदर्शक *मा. प्रा. श्री. शरद यादव सर* यांनी संघटनेच्या मागील काळातील आढावा घेऊन पुढील धेयधोरणाविषयी मार्गदर्शन केले.

मेळाव्यासाठी मुख्याध्यापक श्री मरभळ सर, मित्र मंडळाचे सचिव श्री भीमा लेंभे, कोषाध्यक्ष श्री सुहास भावसार, संघटक श्री दिपक भोये, विभागीय सचिव मुख्याध्यापक श्री. अनुसंगम शिंदे, महिला आघाडी प्रमुख श्रीमती आशालता शिंदे, श्रीमती अनुसया मरभळ, अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री दिलीप तुपे, सचिव श्री श्याम भोये यांनी सभेचे नियोजन केले. मेळाव्यासाठी सहसचिव बालाजी बोंबडे, सातारा विभागीय सचिव श्री मंगेश वडेकर, सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र शिर्के, सचिव सोमनाथ बनसोडे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. गोरख गायकवाड, सहसचिव श्री. हर्षल माळी, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रशांत शिरसाठ, सोलापूर जिल्हा सचिव श्री. श्रीराम केदार, जनार्दन खेताडे, अशोक रणखांब, नवनाथ आडे, अमोल भोंडवे, मंगेश पालवे, सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून दिल्याबद्दल रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग कार्यालय अहमदनगर आणि प्राचार्य, राधाबाई काळे महिला महाविद्यालय यांचे विशेष आभार मानले.यावेळी अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीचे मा. श्री. बाबासाहेब बोडखे यांनी सदिच्छा भेट देऊन मागील काळातील संघटनेच्या कामाचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रयत सेवक मित्र मंडळ अहमदनगर सहसचिव श्री शिवदास सातपुते यांनी केले. आभार प्रदर्शन विभागीय सचिव तथा मुख्याध्यापक श्री अनुसंगम शिंदे यांनी केले.