पॉवर ऑफ मीडिया च्या पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणुन सत्कार

32

🔸तालुक्याचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित

🔹पत्रकारांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान

✒️तालुका प्रतिनिधी,नांदगांव खंडेश्वर(प्रदिप रघुते)

नांदगाव(दि.24ऑगस्ट):-पावर ऑफ मीडिया हे पत्रकाराचे संघटन आहे. पत्रकार प्रतिनिधी दृक्श्राव्य माध्यमे प्रतिनिधी व वृत्तपत्र विक्रेता यांच्याकरिता अहोरात्र कार्यरत आहे कोरोना काळामध्ये ज्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता प्रत्येक बातमी जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पार पाडले व लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ टिकून ठेवण्यासाठी खंबीरपणे उभे राहीले त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता या कोरणा योद्धाचा सत्कार व सन्मान करण्यासाठी पत्रकारांच्या नेहमी पाठीशी उभे असणार्‍या पॉवर ऑफ मीडिया तर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाचे संचालन पॉवर ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष वकील दानिश यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांच्यासह आभार प्रदर्शन पत्रकार उमेश चव्हाण यांनी केले.

यावेळी पॉवर ऑफ मीडिया नांदगांव खंडेश्वर तालुका कार्यकारिणी सदस्य पत्रकार अथर खान, रुपाली नाकाडे, श्रीपाल सहारे, सूरज सहारे, गजानन फिरके यांनी जाहीर प्रवेश घेतला. व या दरम्यान सर्व पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा म्हणुन सत्कार व तसेच उपस्थित मान्यवरांना सुद्धा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी विनोद खेडकर , उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे,प्रमुख पाहुणे वैशालीताई रिठे सभापती प स नांदगाव खंडेश्वर,पुरुषोत्तम भुसारी तहसीलदार नांदगांव खंडेश्वर, बी. डी. राठोड नायब तहसीलदार, सतीश खानंदे सहा. गट विकास अधिकारी, निवासी नायब तहसीलदार तहसील नांदगाव खंडेश्वर डि एस वासनिक, एस डी शहारे नायब तहसीलदार, प्रशांत आवणकर जलसंधारण विभाग, हेमंत ठाकरे ठाणेदार पो स्टे.नां खं., विवेक पडघन ठाणेदार पोलीस स्टे. मंगरूळ च.प्रियंका वासनिक सहा ठाणेदार पोलीस स्टे.नां खं. पद्माकर पाटील उप कार्य अभियंता म रा वि वि कं..मा ही व्हि एन शिंदे.उप कार्य अभियंता, राहुल माने तालुका कृषी अधिकारी, बोकडे साहेब भूमि अभिलेख विभाग, सुनील वाडेवाले दुय्यम निबंधक नांदगाव खं., मीनाक्षी यादव मुख्याधिकारी न‌.पं.नां खं., डॉ. प्रवीणा देशमुख वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रु नां खंडेश्वर,डॉ. भूषण पोतदार वैद्यकीय अधिकारी,तोमर साहेब, संदीप बाजड राज्य संघटक पावर ऑफ मीडिया,उत्तम ब्राम्हणवाडे विभागीय अध्यक्ष पावर ऑफ मीडिया, अमोल नानोटकर विदर्भ सदस्य पावर ऑफ मीडिया, उमेश लोटे जिल्हाध्यक्ष पावर ऑफ मीडिया, फणींद्र वाडकर प्रसिद्धी प्रमुख पावर ऑफ मीडिया, मोहम्मद वकील दानिश जिल्हा उपाध्यक्ष पावर ऑफ मीडिया, योगेश फुके तालुकाध्यक्ष पोलिस पाटील संघटना तालुकाध्यक्ष यांच्या सह
निकेत ठाकरे तालुकाध्यक्ष, सागर सव्वालाखे सचिव, सदस्य उमेश चव्हाण ,देविदास गाडेकर, अवधूत गाडेकर, प्रदीप रघुते, श्रीपाल सहारे, सुरज सहारे, गजानन फिरके, शिवदास उईके, गजानन भस्मे, गोकुल खोडके, प्रमोद देशमुख, उत्कर्ष धांडे ,अथर खान, प्रशांत झोपाटे, संजय पवार, अमोल दांडगे,संदेश ढोके, अंकुश निमनेकर, योगेश राऊत, नितेश कानबाले, सागर गावनेर,अनिकेत शिरभाते, रमेश गांजीवाले,प्रवीण शहाडे,पवन ठाकरे, मनोज जैन, श्रीकृष्ण शीरबहाद्दूरकर, अरुण बनकर व सोबतच पत्रकार सुनील बनसोड यांच्या सह अनेक पत्रकार बंधू उपस्थित होते.