भुंगा….!

36

बांधबंदिस्तीच्या दुर्गम दुर्गातून

कड्याकपारीच्या कडातून

सुस्त ‘भुंगा’ बाहेर आला

उडतो म्हणाला; 

पातळ नाजूक कोऱ्या पंखाने त्याच्या

दिशा नेमकी कोणती घेऊ 

ती काही दिसलीच नाही

‘हो-कायंत्र’ उधारीतले सोबत ठेऊन

‘किडा’ आमचा दिशाहीन झाला….

 

किडा होता की?

दुसऱ्याची शर्यत फत्ते करणारा विडा

मालकाला खुश करून त्याच्या

स्वतःला टाकून पिडेत 

हलवीत त्याचे पंख कोवळे

तुटेपर्यंत उडाला वेडा…

 

पोखरणाऱ्या तू, 

स्वतःच कसा पोखरून गेला

मरायची तुझी भीतीच मेली

आया बाया घरच्या साऱ्या

रडायला इथेच सोडून गेला….

 

समजते का रे किड्या तुला?

अक्कल शिल्लक होती ती

विकली का मसनात गेली

झेंडे कोणाचे उचलत बसला

दंडुके खाऊन नितंबावर आपल्याच

दिशेच्या खिशात कुठे हरवला….

 

उडता-उडता किती उडशील

पंख तुझे सूप होतील

तेव्हा ते छाटले जातील

गरुड हा एकच असतो

इलाका केवळ अलग असतो

कानाखाली जाईपर्यंत मजल तुझी उत्तुंग राहील

मान आणखी काढशील वर तेव्हा

जागीच तुला चित करतील..

 

तुझं काम जे आहे ते कर

बायका पोरे असतील त्यांचा विचार कर

नादी लागून पांढऱ्या बदकाच्या

तूच काळा पडशील कायमचा

बदके तर तिथेच राहतील

डबके फक्त बदलतील…

 

झटका जर जोरात असेलच तर,

उंच डोंगराच्या टोकावर घे भरारी

मजल तुझी तिथपर्यंतच होती

कोणी नसेल तिथे पुढारी

दिशा तुझी तर आधीच गुहेत गायब झाली

काय दाखवशील लाजिरवाणे तोंड आम्हाला थकलेले

जसे गळून पडते पिकलेले

उडी मार आता वरून खाली बदकन

जीव जाईल तुझा हळू-हळू नाहीतर चटकन…

✒️लेखक:-अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो-8806721206)