प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाची नाशिक जिल्हा कार्यकारिणी जाहिर

34

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.26ऑगस्ट):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाची नाशिक जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहिर करण्यात आली असून संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेने, प्रदेश सरचिटणीस नवनाथ गायकर, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नंदू पगार, शहर जिल्हाध्यक्ष चंदन खतेले यांच्या मार्गदर्शनाने नाशिक जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नाशिक जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे : नाशिक जिल्हाध्यक्ष बाबासाहेब गोसावी, जिल्हा महिलाध्यक्षा प्रिया जैन,जिल्हा संघटक मनोहर भावनाथ, जिल्हा संपर्क प्रमुख साजिद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष जाहिद शेख, जिल्हा कार्याध्यक्ष सुनील खरे, जिल्हा सहकार्याध्यक्ष सचिन मोरे, जिल्हा युवाध्यक्ष सोमनाथ क्षेत्रीय, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप बोरसे, जिल्हा उपाध्यक्ष जयदीप भदाणे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र साठे, जिल्हा सहसंघटक रंजन कदम, जिल्हा समन्वयक अशोक निकम, जिल्हा कोषाध्यक्ष शरदचंद्र खैरनार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समसाद पठाण, जिल्हा सहप्रसिद्धीप्रमुख प्रदीप पाटील, जिल्हा कायदेविषयक सल्लागार संदीप गंभीरे आदी पदाधिकाऱ्यांची निवड जाहिर करण्यात आली असून सर्व तालुका कार्यकारिणी लवकरच जाहिर केली जाणार आहे. सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य, विभाग,जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.