उदयकुमार पगाडे यांना “मदर टेरेसा सोसियल सर्व्हिस अवॉर्ड-२०२१” पूरस्कार

31

🔹भारतातून फक्त 50 निवडक उत्कृष्ट व्यक्तींचा विशेष सन्मान

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26ऑगस्ट):-थोर समाजसेविका, त्याग करुणा आणि नि:स्वार्थ मदत याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या भारतरत्न मदर टेरेसा यांची आज जयंती.या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे कर्नाटक राज्यातील नावाजलेली गोल्डन केअर क्लब, बंगलोर ह्या संस्थेमार्फत भारतातील विविध क्षेत्रात निःस्वार्थ समाजकार्य करणाऱ्या निवडक 50 उत्कृष्ट व्यक्तींना विशेष सन्मान देऊन, मदर टेरेसा यांची जयंती निमित्त विनम्र अभिवादन करीत जयंती साजरी केली जाते.

कोरोना महामारीमुळे यावर्षी हा सन्मान सोहळा आज 26-08-2021 रोजी ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आला. यात आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूरीचे रहिवासी, युवा सामाजिक कार्यकर्ते उदयकुमार सुरेश पगाडे यांना मदर टेरेसा सोसियल सर्व्हिस अवॉर्ड-2021 हा राष्ट्रीय सन्मान देऊन ऑनलाइन स्वरूपात गौरविण्यात आले.निवडक 50 व्यक्तींमधून उदयकुमार पगाडे हे सर्वात कमी वयाचे पुरस्कार विजेते ठरले, असे संस्थेचे अध्यक्ष के. सुधाकर रेड्डी यांनी सांगितले आहे.