गंगाखेड लॉयन्स क्लब जनाईचा पदग्रहण सोहळा

26

🔸कर्तबगार महिलांचा होणार सन्मान

🔹मुंबईचा डबेवाला देणार व्याख्यान

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी )

गंगाखेड(दि.27ऑगस्ट):-आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांमध्ये सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या लॉयन्स क्लब गंगाखेड जनाई च्या पदग्रहण समारंभ ऊद्या दिनांक २८ ऑगस्ट रोजी संपन्न होत आहे. याच कार्यक्रमात गंगाखेड नगरीतील कर्तबगार महिलांचा सन्मान केला जाणार असून प्रमुख व्याख्याते म्हणून येत असलेल्या मुंबईच्या डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांचे विचार ऐकण्याची संधी शहरवासीयांना मिळणार असल्याची माहिती नुतन अध्यक्ष सुशांत चौधरी, स्वागताध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली आहे.

ऊद्या सायंकाळी सहा वाजता साई वृंदावन लॉन्स येथे आयोजित समारंभाचे अध्यक्ष म्हणून परभणी जिल्ह्याचे काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेशराव वरपुडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून, परभणी जिल्हा आरटीओ श्रीकृष्ण नकाते, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत मुंडे, वीज वितरण कंपनी सह अभियंता नितेश भसारकर, ॲड सूर्यकांत चौधरी, लॉयन संतोष निर्वाणी, माजी सैनिक संघटनेचे विश्वनाथ सातपुते उपस्थित राहणार आहेत. तर प्रमुख वक्ते म्हणून मुंबई डबेवाला असोसिएशन चे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय वक्ते, रोटी बँक- कपडा बँकेचे अध्यक्ष सुभाष तळेकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

या शपथ ग्रहण समारंभा सोबतच विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा संत जनाई नारी सम्मान पुरस्कार देवून गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये मिसेस महाराष्ट्र म्हणून गौरविण्यात आलेल्या गंगाखेड कन्या डॉ. सौ उषाताई काळे मुंबई, रणरागीणी वृद्धाश्रमाच्या संचालीका सविता चव्हाण, सौ मंजू दर्डा, डॉ अनिता शिरसाट, वैजयंता घनवटे, श्रीमती शकुंतला ( मम्मी) कुलकर्णी, सौ सूर्यमाला मोतीपवळे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या सन्मान सोहळ्याचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळ काका चौधरी हे असणार आहेत.

साई वृंदावन लॉन्स परळी रोड गंगाखेड येथे आयोजित या सोहळ्यास आपण आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष तथा झोन चेअरमन संतोष तापडिया, नुतन अध्यक्ष सुशांत चौधरी, सचिव दिलीप सोळंके, कोषाध्यक्ष अतुल तुपकर, संस्थापक सदस्य तथा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष गोविंद यादव, संस्थापक अध्यक्ष सुहास देशमाने, सचिव अनंत मुंडे कोषाध्यक्ष गजानन महाजन, व सर्व सदस्य लायन्स क्लब गंगाखेड जनाई च्या वतीने करण्यात आले आहे.