प्रत्येकाला लस ही प्रत्येकाची जबाबदारी – सुधीर पाटील

30

🔹संभाव्य तीसऱ्या लाटेतील जीवीत हानी टाळण्यासाठी लसीकरण हाच ऊपाय – पाटील

🔸साईसेवा-सवंगडीच्या मोहीमेत २१८ जणांचे लसीकरण

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.27ऑगस्ट):- कोरोना पासून बचावासाठी लस हे एकमेव कवच कुंडल आहे. लसी संदर्भातील गैरसमज दूर करून प्रत्येक नागरिकाने लस घेतली पाहिजे आणि ती घेतली जावी यासाठी प्रत्येक जागरूक नागरीकाने प्रयत्न करावेत, असे आवाहन गंगाखेडचे ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. श्री साईसेवा प्रतिष्ठाण आणि सवंगडी कट्टा समुहाच्या वतीने आयोजीत प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

गंगाखेडच्या खडकपूरा गल्ली येथील संत सावता माळी मंदीरातून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यात आज २१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. मंचावर वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे, डॉ. पी. आर. चट्टे, लॉयन्स क्लब जनाईचे अध्यक्ष सुशांत चौधरी, नगर परिषद सदस्य नितीन चौधरी, लॉ. प्रा. डॉ. मुंजाजी चोरघडे, धनगर साम्राज्य सेनेचे सखाराम बोबडे, सामाजीक कार्यकर्त्या प्रा. मंजू दर्डा, लॉ. संतोष तापडिया, सल्लागार अभियंता नागेश पैठणकर, व्यापारी गजानन महाजन, नागेश कोनार्डे आदिंची ऊपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना सुधीर पाटील यांनी लसीकरणाचा वेग आणि दर वाढवण्याची गरज प्रतीपादीत केली. संपुर्ण शहरात आणि ग्रामिण भागात असे कॅंप घेण्यात येणार असल्याचे सांगत साई सेवा आणि सवंगडी समुहाच्या या ऊपक्रमाचे कौतूक केले. डॉ. हेमंत मुंडे यांनी लशी संदर्भातील गैरसमज दूर ठेवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तावीक साईसेवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी, सुत्रसंचालन मनोज नाव्हेकर यांनी तर आभार प्रदर्शन रमेश औसेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अमृत भोसले, नोमाजी गोरे, राजाभाऊ यादव, रामा गिराम, नागेश डमरे, सुनिल वाघमारे, माऊली डमरे, सुभाष डमरे, प्रमोद चौधरी, सोपान टोले, गोपीनाथ नगरकर आदिंनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी साहेबराव चौधरी, प्रथम यादव, आदित्य चौधरी, अभिजीत चौधरी, बाळासाहेब डमरे, सागर गोरे, अभिषेक यादव, मुक्ताराम यादव, स्वप्नील गिराम, गणेश चौधरी, हरी साबणे, सचीन वाघे, अनिल वाघमारे, नरहरी डमरे, योगेश चौधरी, ओम शिंगणे आदिंसह खडकपुरा भागातील युवकांनी परीश्रम घेतले.