वंचित बहुजन आघाडी कोथरुड विधानसभा सचिवपदी विशाल सरवदे यांची निवड

27

✒️समाधान गायकवाड (विशेष प्रतिनिधी)

कोथरूड पुणे(दि.२९ऑगस्ट):-वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा मा.रेखाताई ठाकुर यांनी कोथरुड विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या सचिवपदी मा.विशाल सरवदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे श्रध्देय बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ते कोथरुड विधानसभा मतदारसंघात सर्वपरिचित आहेत.

पक्षाच्या प्रत्येक आंदोलन, मोर्चा,या मध्ये ते सक्रिय सहभागी असतात तसेच त्यांनीं केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पक्षाने त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे.त्यांच्या या निवडीचे पुणे शहर अध्यक्ष मा.मुन्नवर कुरेशी, शहर महासचिव मा.अँड अरविंद तायडे, पुणे शहर सहसंघटक सतीष रणवरे, कोथरुड विधानसभा अध्यक्ष मा.अजय ताम्हणे, विजय प्रधान, विशाल लोंढे,राम चव्हाण, प्रवीण सोनवणे, दीपक कांबळे, अक्षय गोटेगांवकर आदींनी स्वागत केले आहे..