युवासेने चे मोफतनेत्र तपासणी शिबीर हे सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम – आ.प्रकाश सोंळके

27

✒️समाधान गायकवाड(विशेष प्रतिनिधी)

माजलगाव(दि.२९ऑगस्ट):-शहरात सर्वांसाठी युवासेने मोफत नेत्र आरोग्य तपासणी शिबीर घेवुन सामाजिक बांधिलकी जपली असुन सर्वसामान्य माणसाच्या हिताचे असे वेगवेगळे शिबिरे मोठ्या प्रमाणात घेणे गरजेचे असल्याचे मत आ.प्रकाश सोंळके यांनी व्यक्त केले.युवा सेना आणि आनंद ऋषीजी नेत्रालय व्हिजन सेंटर व दृष्टी आयकेअर अँण्ड आँप्टीकल्स यांच्या वतीने युवा सेना तालुका प्रमुख बाळासाहेब मेंडक यांनी जिजामाता नगर येथे दि.२८ आँगस्ट शनिवार रोजी आयोजित मोफत नेत्र आरोग्य शिबीराच्या उदघाटन प्रसंगी आ.सोळंके बोलत होते.

या शिबीराच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शेख मंजुर, बाजार समिती चे संचालक अनंतराव सोंळके, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम येवले,माजी उपनगराध्यक्ष सुनिल खंडागळे, दासु बादाडे, माजी नगरसेवक शिवमुर्ती कुंभार, सतिष बोटे,अमोल डाके,उपस्थित होते.या शिबिरात नेत्रतज्ञ डॉ गणेश मस्के यांनी शहरातील १२० रूग्णांच्या डोळ्याच्या तपासण्या करून ५० रूग्णांना अल्पदरात चष्मे देण्यात आले आणि २५ रूग्णांच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले कि शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना च सांगितले कि राजकारण २० % आणि समाजकारण ८० % करीत आहे तोच आदर्श समोर ठेवून प्रत्येक शिवसैनिक हा राजकारण पेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देत असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन विरभद्र स्वामी यांनी केले तर आभार बाळासाहेब मेंडके यांनी मानले.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी अभय मोहरीर, शुभम डाके,युवा सेना शहर प्रमुख सुंदर विके,उप शहर प्रमुख सचिन दळवी,शेख रहीम ,राम कुलकर्णी, आदी नी परिश्रम घेतले.