युवा शक्ती संघ हातोला आयोजित दहीहंडी महोत्सव रद्द

31

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.30ऑगस्ट):-सालाबाद प्रमाणे कृष्ण जन्माष्टमी च्या गोपाळ काला निमित्ताने या दिवशी हातोला येथे श्रावण मास सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी होत असलेला दहीहंडी महोत्सव कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर याहीवर्षी रद्द करण्यात आलेला आहे.आष्टी तालुका व परिसरात फक्त हातोला या गावात दहीहंडी महोत्सव दरवर्षी सन २०१२ पासून साजरा होत असलेला दहीहंडी महोत्सव ही सलग दोन वर्ष रद्द केलेला आहे.

समस्त गावकरी हातोला खलाटवाडी व युवाशक्ती संघाचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून राज्यात तसेच बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाची तिसरी लाट बळावत आहे.कोरोनाचा धोका ओळखून याची जाणीव ठेवून सर्वानुमते यावर्षी दहीहंडीचा महोत्सव न करण्याचे ठरविले आहे.अशी माहिती युवाशक्ती संघाचे अध्यक्ष प्रा.शिवाजी राख सर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.