कोरोना बिलांचे लेखापरीक्षण करावे म्हणून २ ऑक्टोबरला मुंबईत रुग्ण हक्क परिषदेचा महामोर्चा होणार- श्री उमेश चव्हाण यांची माहिती

28

🔹अतिरिक्त बिलांचे पैसे परत देणारा ‘माढा पॅटर्न’ राज्यात राबविण्यासाठी राज्यातून लाखो लोक मुंबईत महामोर्चासाठी येतील

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

पुणे(दि.30ऑगस्ट):- सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यामध्ये रुग्ण हक्क परिषदेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष संजय लोहार, उपाध्यक्ष बाबा चौबे आणि माढा तालुका अध्यक्ष रमेश मोठे, चेतन शिंदे यांनी कोरोनाग्रस्तांवर उपचार केलेल्या हॉस्पिटलची दुबार लेखापरीक्षणाची मागणी शासनाकडे केली, त्यातून काही हॉस्पिटलमधून रुग्णांची अव्वाच्या सव्वा बिल आकारून जास्त पैसे घेतल्याचे आढळून आले. ही घोटाळा केलेली रक्कम वीस लाख रुपयांहून जास्त असल्याचे शासनाने जाहीर केले. या आंदोलनाचे यश म्हणून लागलीच लोकांना त्यांचे घेतलेले जास्त पैसे परत देण्यास सुरुवात झाली. *रुग्णांचा न्याय हक्कासाठी लढा देणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेचा हा ‘माढा पॅटर्न’* राज्यात राबविण्यासाठी *महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर २०२१ रोजी मुंबईत लाखो नागरिकांच्या सहभागाने रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने ‘कोरोना आक्रोश महामोर्चा’* काढण्यात येणार असल्याची माहिती रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष मा.श्री उमेश चव्हाण यांनी दिली.

लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, नोकऱ्या, व्यवसाय उद्ध्वस्त झालेले असताना लाखो लोकांना चार लाख, पाच लाख, आठ लाख रुपयांची बिले कोरोना वरील उपचारांसाठी कर्ज काढून, दाग – दागिने विकून, पोटाला चिमटा काढून, साठवलेले पैसे या महामारीतील आजारपणासाठी खर्च करावे लागले. मनमानी पद्धतीने कोरोना वरील बिले आकारण्यात आली. शासनाने ठरवून दिलेल्या नियमापेक्षा किती तरी पटींनी जास्त लाखो रुपयांचा लोकांना भुर्दंड भरावा लागला. या राज्यात लाखो रुपयांची कोरोना रोगावरील उपचारांची बिले आकारलेल्या सर्वच हॉस्पिटलचे दुबार लेखापरीक्षण झाले पाहिजे आणि दोषी आढळलेल्या हॉस्पिटल वर गुन्हा दाखल करून *’माढा पॅटर्न’* प्रमाणे नागरिकांना तात्काळ त्यांचे लुटीचे जादा घेतलेले पैसे परत दिलेच पाहिजेत. इतर कुठल्या रोगांवर घेतलेल्या बिला बाबत आम्ही आक्षेप नोंदवत नाही तर या महामारीतही लोकांची लूट होऊ न देणे ही सरकारची जबाबदारी होती.

लोकांचे लूट करून घेतलेले जादाचे पैसे पुन्हा लोकांना परत करावेत हा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठीच २ ऑक्टोबर रोजी लाखो लोकांच्या सहभागाने मुंबईमध्ये *’कोरोना आक्रोश महामोर्चा’* काढण्यात येईल, यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीची बैठक परिषदेचे अध्यक्ष मा.श्री उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पुण्यात झाली.

या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आनंद शेट्ये, कार्यालयीन सचिव संजय जोशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख डॉ. सलीम आळतेकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक शैलेश खुंटये, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील शेजवळ, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय लोहार, कोकण प्रदेशाध्यक्ष सुहास पांचाळ, विदर्भ प्रदेशाध्यक्ष अमोल गीते, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष बाबा चोबे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अहमद बाबा बागवाले, सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कल्पना पवार, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा साठ्ये, पिंपरी-चिंचवड महिला आघाडी अध्यक्ष प्रीती खुंटये, पुणे जिल्हा अध्यक्ष अल्ताफ तारकश, पुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रकाश तोरणे, परभणी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पुंड, केंद्रीय कार्यालय उपसचिव गिरीश घाग, गणेश भोईटे, रामचंद्र निंबाळकर, गणपतराव फराटे, वनिता पंडित, दौंड तालुका अध्यक्ष कैलास कांबळे उपस्थित होते.

राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावागावातून आपली लूट झालेल्या लोकांना न्याय मिळावा म्हणून लाखो लोक या आक्रोश महामोर्चा मध्ये सहभागी होतील यासाठी महिनाभर मोर्चाचे आयोजन आणि दोन हजारापेक्षा जास्त बैठका घेण्यात येतील असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.