आॅफ्रोट तालुका शाखा चिमूर चे वतीने आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

29

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.30ऑगस्ट):-आॅफ्रोट तालुका शाखा चिमूर चे वतीने पंचायत समितीच्या सभागृहात आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला.ऑर्गनायझेशन फॉर राइट्स् ऑफ ट्रायबल तालुका शाखा चिमूर च्या वतीने आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला नानाजी आत्राम (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उदघाटकविजय कुमरे( अध्यक्ष आॅफ्रोट चंद्रपूर), प्रमुख पाहुणे शंकर मडावी सचिव आॅफ्रोट चंद्रपूर ,मा . नागेंद्र कुमरे चंद्रपूर, मा. बंडू मडावी चंद्रपूर, मा. रवी वरखडे चिमूर, विलास कोयचाडे, सुनिल मसराम सर ,मा. डॉ राजू मडावी यांचे प्रमुख उपस्थिती
गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमात अतिशय नियोजनबद्ध व शिस्तप्रिय पद्धतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

आफ्रोट संघटनेच्या कार्यशैली ला अनुसरून पंचायत समिती चिमूर च्या सभागृहात अतिशय आनंदमय व प्रसन्न वातावरणात चिमूर तालुक्यातील आफ्रोटचे अनेक सभासद व दहावी / बारावी मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आपल्या पालकासह उपस्थित होऊन आफ्रोट संघटनेच्या माध्यमातून आयोजित सन्मान सोहळ्यात दर्शवलेली उपस्थिती हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.कार्यक्रमासाठी नियोजित पाहुणे उपस्थित होऊन विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शनासह भविष्यकालीन जीवनाचे काही कानमंत्र देऊन शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना बक्षीसामध्ये छोटीशी भेट वस्तू, प्रमाणपत्र व एक गुलाबाचे रोपटे देवून चिमूर तालुक्यातील दहावी व बारावीच्या तिस विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिमूर आफ्रोट तालुका शाखा चे अध्यक्ष प्रकाश कोडापे,सचिव होमराज सिडाम, कोषाध्यक्ष डॉ. मडावी आणि नंदू सोयाम, विलास कोयचाडे, जिवन येरमे, देवदास धुर्वे, सुनिल मसराम, रघुनाथ कन्नाके, अरुण उईके, प्रदिप टेकाम, मारोती मसराम, देवानंद मेश्राम, भारत कोडापे यांनी अतिशय अल्प कालावधीत योग्य रीतीने नियोजन करून प्रचंड उत्साही वातावरणात निरंतरपणे प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी केला .चिमूर तालुक्यात संघटनेच्या वाढीसाठी व संघटनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकत्रितपणे राहून अशाच प्रकारे एकीच्या ताकतीने आफ्रोट संघटनेसोबत सहयोग दर्शवून संघटना वाढीसाठी सहकार्य कराल या अपेक्षेसह आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला.

सत्कार मुर्ती कु. सानिया पुरुषोत्तम कुमरे या विद्यार्थीनीने बारावीला ९१% टक्के गुण प्राप्त केल्या बदल आपले मनोगतात भविष्यात डॉ. बनुन समाजाची सेवा करण्याचे गौरव उदगार काढले तसेच कु. विधी अरविंद गेडाम या विद्यार्थ्यांनीने दहावीला ८७%गुण प्राप्त केल्याबद्दल आपले मनोगतात इंजिनिअर बनुन आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक होमराज सिडाम सचिव आॅफ्रोट संघटना चिमूर यानी केले. सुत्रसंचलन प्रकाश कोडापे अध्यक्ष आॅफ्रोट चिमूर यांनी केले.